मूलवासियांनी अनुभवले ध्वनी प्रदूषण,लेझर किरणे आणि गोंधळ
प्रशासनही हतबल
मूल :- गणपती विसर्जन शांततेत पार पडले असले तरी,मुलवासियांनी बुधवारी रात्री येथिल गांधी चौकात गोंधळ ,कर्णकर्कश आवाज अर्थात ध्वनीप्रदुषण ,लेझर किरणांचा झगमगाट आणि फटाक्यांची आतीषाबाजी अनुभवली. शांतता कमेटी मध्ये ठरलेले नियमही पायदळी तुडवल्या गेले. भक्तांच्या उत्साहापुढे प्रशासन मात्र,हतबल झाल्याचे दिसत होते. राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने मूल येथील गांधी चौकात तीन पक्षाचे तीन मंडप उभारले गेले होते. भाजपाच्या मंडपात स्वतः जिल्हयाचे पालकमंत्री आणि राज्याचे वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.कॉंग्रेसने उभारलेल्या मंडपात कॉंग्रेस कडून इच्छूक उमेदवार संतोष रावत उपस्थित होते.तिस-या मंडपात शिवसेना उबाठा गटाचे इच्छूक उमेदवार संदिप गि-हे उपस्थित होते. तीन पक्षांच्या तीन मंडपातून गणेश मंडळां साठी आयोजित केलेल्या स्पर्धेतील बक्षिसांचे वितरण सुरू होते. नेते मंडळी भक्तांना अभिवादन करीत होती. गांधी चौकात उभारलेल्या मंडपांना नगर पालिका प्रशासनाने कोणतीही परवानगी दिलेली नव्हती.पालिका प्रशासनाचे मंडप हटविण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. तीनही पक्षांच्या पदाधिका-यांना नोटीस बजाविल्याचे स्वतः मुख्याधिकारी दोडे यांनी सांगितले.तीन पक्षांच्या तीन मंडपातून गणेश भक्तांना केवळ गोंधळ ऐकू आला.कोणालाच काही स्पष्ट ऐकू नव्हते.गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या आवाजावर प्रशासनाचा लगाम नव्हता.कर्णकर्कश आवाजाने कानठळया बसल्या. तसेच लेझर किरणांच्या झगमगाटावर बंदी असूनही लेझर किरणाचा सर्रास वापर झालेला होता.या सर्वावर कारवाईसाठी कोणीही पुढे आले नाही.शेवटी प्रशासन हतबल झाल्याचे दिसत होते. विसर्जन मिरवणुक शांततेत पार पडली तरी ,नियमांचा भंग करणा-यांवर प्रशासन कोणती कारवाई करते याकडे मूलवासियांचे आता लक्ष लागले आहे.

” यांनी दाखविली सहानुभूती :- गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत फटाक्यांची सुदधा आतिषबाजी होती.ऐन गर्दीत फटाक्याचा बार उडविला जात होता. यात काही भक्त किरकोळ जखमी झाल्याचे समजते. मिरवणुकीत कर्तव्यावर असलेल्या एका होमगार्डच्या हाताला मार बसला होता. त्या होमगार्डने मेडीकल स्टोअर्स गाठून उपचार करून घेतले.साई मेडीकल स्टोअर्सचे संचालक मनिष येलटटीवार यांनी स्वतः त्या होमगार्डवर मलमपटटी करून दिली.त्यांची सहानुभूती यावेळी दिसून आली. “
मिरवणुकीत कोणतेही गालबोट लागले नाही.विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आणि गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती.येथील बसस्थानकाजवळच्या तलावावर गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. पोलिस प्रशासनाचा बंदोबस्त तगडा होता. बाप्पाची मिरवणूक शांततेत पार पडली. असे असले तरी ,गांधी चौकातील गोंधळाची ,डिजेच्या ध्वनीप्रदूषणाची आणि लेझर किरणांच्या झगमगाटाची दुस-या दिवशीही खमंग चर्चा होती. असा प्रकार मूल मध्ये पहिल्यांदाच घडल्याचे अनेकांचे म्हणणे होते.