मूल नगर परिषद माझी वसुंधरा अभियानात नागपूर विभागात प्रथम

82
मूल नगर परिषद माझी वसुंधरा अभियानात नागपूर विभागात प्रथम
मूल :- माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये झालेल्या मानांकनात नागपूर विभागातून मूल नगर परिषदेने प्रथम कमांक प्राप्त करून 75 लक्ष रूपये प्राप्त केले आहे. याबाबत मूल नगर परिषदेचे अभिनंदन होत आहे. नगर परिषदेच्या माध्यमातून दररोज स्वच्छतेवर अधिक भर दिला जात आहे.दररोज वार्डा वार्डात घंटागाडी द्वारे ओला आणि सुका कचरा गोळा केल्या जातो.नाल्यांची नियमित सफाई केल्या जाते. घनकचरा प्रकल्पामध्ये कचरा एकत्र केल्या जातो. ओला कचरा पासून खत निर्मिती केल्या जाते. सुका कच-यातील प्लास्टिक आणि काच रिसायंकलींग साठी पाठविल्या जाते.नगर पालिकेच्या माध्यमातून नियमित पणे नळाद्वारे स्वच्छ आणि शुदध पाणी पुरवठा  वितरीत होतो.तसेच सौंदर्यीकरण,पर्यावरण,पाणी संवर्धन,वृक्षारोपण,हरीत क्रांती,मालमत्ता कर,पाणी कर गोळा करणे याबाबत भरीव कामगिरी केली.त्यामुळे विविध पैलूंनी विचार करून मूल नगर पालिकेला माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी,पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अभियंता श्रीकांत समर्थ,आरोग्य निरिक्षक अभय चेपूरवार,शहर समन्वयक आलेख बारापात्रे, व कर्मचारी वृंदानी अथक परिश्रम घेतले.


पृथ्वी,जल,वायू,अग्नी,आणि आकाश या निसर्गाच्या संबंधित पंचतत्वावर आधारीत माझी वसुंधरा अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये 2 ऑक्टोबर 2020 पासून राबविण्यास सुरूवात झाली.तर माझी वसुंधरा अभियान 4.0 हे  अभियान एक एप्रिल 2023 ते 31 मे 2024 या कालावधीमध्ये राबविण्यात आली.


पर्यावरण पुरक उपाययोजना,स्वच्छता,पाणी संवर्धन,वृक्षारोपण आणि हरीत शाश्वतेबाबत केलेल्या कामगिरीचे हे फलित आहे.हे बक्षिस संपूर्ण नगर परिषदेच्या आणि नागरिकांच्या सामुहिक प्रयत्नाचे यश आहे. या सन्मानामुळे भविष्यात आणखी प्रेरणा मिळेल.असे मुख्याधिकारी संदीप दोडे म्हणाले.