त्या जागेचा आम्हाला स्थायी पटटा मिळावा – सिंधुबाई वाडगूरे

73
त्या जागेचा आम्हाला स्थायी पटटा मिळावा – सिंधुबाई वाडगूरे
त्यांची मागणी अयोग्य
मूलः- ख्रिस्ती समाजाने भू मापन क्रमांक 282 मधील जागेची स्मशानभूमीसाठी मागणी केली आहे. ती त्यांची मागणी अयोग्य आहे.कारण त्या जागेचा कच्चा पटटा  माझ्या वडिलांना 1950 मध्ये मिळाला आहे.त्यावर मी मोठी मुलगी म्हणून त्या शेतजमिनीवर शेती करीत असून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. अशी माहिती ताडाळा येथील सिंधुबाई मारोती वाडगूरे यानी पत्रकार परिषदेत सांगितली. मूल येथील विश्राम गृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, गेल्या पन्नास वर्षांपासून आम्ही त्या  शेतजमिनीचा  पक्का पटटा मिळावा यासाठी प्रशासनाशी पत्रव्यवहार करीत आहोत. मौजा मूल येथील तलाठी साजा क्रमांक 13 मधील भूमापन क्रमांक 282 मध्ये आराजी 1.59 हे आर सरकारी जमिनी पैकी आराजी 1.20 हे आर जमिनीवर सन 1950 पासून अतिक्रमण करून वाहिती करीत आहोत.तसेच उत्पन्न घेवून कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत आहोत.माझी आर्थिक परिस्थीती हलाखीची आहे.त्या जमिनी व्यतिरिक्त मला दुसरे उत्पन्नाचे साधन नाही.नुकतेच ख्रिस्ती समाज बांधवाने त्या जागेसंदर्भात मागणी केली आहे. त्यामुळे आम्हाला धक्का बसला. उमा नदीच्या काठावरील स्मशानभूमी आणि संतवाडीजवळ असलेली ती जागा माझे वडील पत्रु हरको वाढई यांच्या नावाने कच्चा पटटा म्हणून आहे.चार मुलींपैकी मी  मोठी मुलगी म्हणून वहिवाट करीत आहे. प्रशासनाकडे केलेल्या पत्रव्यवहारानुसार तलाठी कार्यालयाने 2015 मध्ये मौका चौकशी केली आहे.त्यामुळे आम्हाला स्थायी पटटा मिळावा अशी मागणी सिंधुबाई वाडगूरे यांनी केली. पत्रकार परिषदेला त्यांचा मूलगा कैलास मारोती वाडगूरे उपस्थित होता.
अहवाल काय म्हणतो – मूल येथिल तहसिलदार यांच्या आदेशान्वये,तलाठी मूल यांनी 25 ऑक्टोबर 2016 रोजी एक अहवाल सादर केला आहे.त्यात,सर्व्हे नंबर 282 आराजी 1.59 हे आर जमिन सरकार झुडपी जंगल म्हणून दर्ज आहे.सदर जमिनीवर स्मशानभूमी व अर्जदार यांचे शेती प्रयोजनार्थ अतिक्रमण आहे.