‘त्या’ मद्यपीने उडविली वनविभागाची झोप

74
‘त्या’ मद्यपीने उडविली वनविभागाची झोप
दारूच्या नशेत वाघाच्या जंगलातून केला रात्रीच प्रवास
मूल :- दारूच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने आपल्या घरी न पोहचता दुस-याच गावाचा रस्ता पकडला.कुटुंबीय चिंतेत सापडले. गावाकडे जाणारा रस्ता दाट किर्र जंगलाचा . वाघाच्या हल्ल्यात बळी तर गेला नसेल ना,याची भिती.गावात खळबळ. मग ,तिथून सुरू झाली शोधमोहिम.दुस-या दिवशी मात्र दुस-या गावाला सुखरूप.त्यामुळे सर्वांनी सोडला सुटकेचा निःश्वास.कुटुंबीयासह गावक-यांचा जीव भांडयात पडला. ही घटना बुधवारी रात्री घडली. मात्र,या घटनेने त्या मद्यपीने वनविभागाची चांगलीच झोप उडविली.या घटनेची गावात खमंग चर्चा होती. त्याचे झाले असे की,मूल तालुक्यातील काटवन येथील पन्नास वर्षीय दामोधर नामक व्यक्तीने कुठेतरी दारू ढोसली.अंगभर नशा झाली.निट चालता येईना.रात्र झाली.रस्त्याने चालताना कोणत्या रस्त्याने चालत आहोत याचे त्याला भानही नव्हते.फक्त एका व्यक्तीने हा दारू ढोसून होता.असे बघितले होते.रात्र झाल्यानंतरही घरी न पोहचलेल्या त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना चिंता आणि भिती सतावू लागली. मूल तालुक्यातील करवन आणि काटवन ही दोन गावे वाघाच्या बाबतीत बफर क्षेत्रातील अतिसंवेदनशिल गावे.या भागात वाघाचा मोठा संचार आहे.वाघाच्या हल्ल्यात या दोन गावातील काहींचा बळी गेलेला आहे.त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या कुटुंबीयांनी ही माहिती पोलिस पाटलाला सांगितली.पोलिस पाटलाने बीट गार्डाला सांगितले.त्यांने आपल्या वरिष्ठांना कळविले.सदर व्यक्तीसाठी गावक-यांसह वनविभागाच्या कर्मचा-यांनी रात्रोच्या सुमारास शोधमोहीम राबविली. जंगल परिसर सर्च केला. मात्र,त्याचा काही शोध लागला नाही.परत गुरूवारी सकाळी वनविभागाच्या कर्मचा-यांनी जंगल परिसर शोधून काढला.तरीही थांगपत्ता लागला नाही.शेवटी करवन या गावातून माहिती मिळाली.सदर व्यक्ती या ठिकाणी असल्याचे सांगितल्या गेले. दारूच्या नशेत आपण वाघाचे अस्तित्व असलेल्या  जंगल परिसरातून रात्री दुस-याच गावी भटकलो.त्याचे त्याला साधे भानही उरले नव्हते.वनविभागाने आणि गावक-यानी त्या दामोधरला सुखरूप त्याच्या कुटुंबीयाच्या स्वाधीन केले. स्वता बफर  वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी राहूल कारेकर उपस्थित राहून मोहीमेचा आढावा घेत होते.त्यावेळेस त्यांची पेट्रोलिंग सुदधा सुरू होती.मात्र,त्या मद्यपीने वनविभागाची झोप तर उडविली.ऐवढेच नव्हेतर कुटुंबीयांची आणि गावक-यांची चिंताही वाढविली होती. या घटनेची करवन आणि काटवन गावात चांगलीच चर्चा होती.