लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक
मूल तालुक्यात पक्ष संघटन मजबूत करू: मंगेश पोटवार तालुका अध्यक्ष
मूल :- येथील तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार यांच्या अध्यक्षतेखाली तालुका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची विकासाची भूमिका आणि नामदार अजित पवार यांनी दिलेला विकासाचा विचार बहुजनाचा हा संदेश घेऊन मुलं तालुक्यातील गावागावत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शाखा सुरु करण्याचा संकल्प यावेळी उपस्थित कार्यकर्ते आणी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. होणाऱ्या लोकसभा निवडणुकामध्ये महायुतीतील घटक पक्ष म्हणुन जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणी अजितदादाचे सैनिक म्हणुन निवडणुकीमध्ये मोलाचा वाटा उचलन्याचा निर्धार सर्वांनी करावा, अशी अपेक्षा मुलं तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार यांनी व्यक्त केली.
आढावा बैठकीला मुलं शहर अध्यक्ष आकाश येसनकर, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष रोहित कामडे, महिला तालुका अध्यक्ष संगीता गेडाम, महिलांच्या मुलं शहर अध्यक्ष धारा मेश्राम, सामाजिक न्याय चे अध्यक्ष गुड्डू निमगडे, ओबीसी आघाडीचे तालुका अध्यक्ष वासुदेवजी पिपरे, तालुका उपाध्यक्ष उमाजी चुधरी, दामोधर सोनुले, वैधकीय मदत कक्षाचे तालुका अध्यक्ष आनंदरावं गोहने,अल्पसंख्यांक आघाडीचे शहर अध्यक्ष आशु खान,सोशल मीडियाचे प्रमुख भावेश रामटेके, सुनील कामडी, वतन चिकाटे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी महेंद्र कोडापे, उमाजी चुधरी याच्यावर तालुका उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवीण्यात आली. तर रोजगार आघाडीच्या शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी रजत कुकुडे याच्यावर सोपविण्यात आली. तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले.यावेळी मुलं शहरातील महिला भगिनींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि नामदार अजितदादाच्या विचारवर श्रद्धा ठेवीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.
यावेळी मुलं तालुक्यातील यश लेनगुरे, सौरभ तायडे, सुवर्णाताई रामटेके, सुनीता सुखदेवे, मालाताई शेंडे प्रणय रायपुरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.