कुत्रे भूंकल्याने बाजार समितीच्या आवारात रानगवा भटकला
रेस्क्यू ऑपरेशन नंतर सुरूक्षित पणे जंगलात परतविले
मूल :- नवतपाने अंगाची लाही लाही होत आहे.प्रचंड वाढलेल्या उष्णतेची तीव्रता वन्यप्राण्यांना सुदधा बसत आहे.जंगलातील पाणवटे आटून चालले आहे.अशाच एका जंगलातील रानगव्याला झळ पोहचली. पाण्याच्या शोधात असताना गावाशेजारी आला. कु़त्रे भुंकल्याने हा रानगवा मूल शहरात भटकला.शनिवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास स्थानिक रहिवासींना मूल येथील बाजार समितीच्या आवारात आणि चौखूंडी हेटीवर रानगवा फिरताना आढळून आला. येथील स्थानिक रहिवासी विक्की कोहळे यांनी संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य तन्मयसिंह झिरे यांना माहिती दिली. गावात शिरलेला हा रानगवाच आहे,याची खात्री पटल्यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली.तात्काळ वनविभागाच्या कर्मचारी आणि संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्यांनी रेस्क्यू ऑपरेशन करून रानगव्याला महाबिज केंद्राच्या मागे असलेल्या जंगलात सुरूक्षितपणे परतविले. रानगवा सुरूक्षितपणे जंगलात परत गेल्याने येथील परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. यावेळी मूल प्रादेशिकचे क्षेत्र सहायक मोरेश्वर मस्के,महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे क्षेत्र सहायक आर.जी. कुमरे,वनरक्षक एस.आर.ठाकूर,संजीवन पर्यावरण संस्थेचे तन्मयसिंह झिरे,मनोज रणदिवे,योगेश गावंडे यांनी रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडले. याआधीही वनविभागाच्या आवारात आणि रेल्वे पटरी पुलाच्या खाली अस्वलीने ठाण मांडले होते. प्रादेशिक आणि बफर जंगल क्षेत्र मूल शहराला लागून असल्याने वन्यप्राण्यांची भटकंती हा नेहमीचाच विषय ठरला आहे.