मूल मध्ये ग्रीष्मकालिन कुस्ती व वेटलिफटींग खेळाचे निःशुल्क प्रशिक्षणाचे आयोजन
मूल :- येथील तालुका क्रीडा संकूल मध्ये शालेय विदयार्थ्यांसाठी ग्रीष्मकालिन कुस्ती व वेटलिफटींग खेळाचे निःशुल्क प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.त्यासाठी इच्छूक खेळांडूसाठी प्रवेश देणे सुरू झाले आहे.लहान मुलांमध्ये कुस्ती व वेटलिफटींग या खेळाची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांना या खेळाबाबत तंत्रशुदध प्रशिक्षण मिळावे यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.यातून खेळाडू शारीरिक आणि मानसिक दृष्टया सक्षम बनेल असा उदेश आहे. 1 मे 2024 ते 31 मे 2024 पर्यत सकाळी आणि सायंकाळी अशा दोन वेळेत प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. स्पर्धेच्या युगात अभ्यासाला महत्व दिल्या जात असल्याने खेळांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.शालेय विदयार्थ्यांमध्ये अशा खेळांविषयी आवड निर्माण झाल्यास प्रशिक्षणाच्या माध्यमातून उत्कृष्ट खेळाडू तयार होण्यास मदत होणार आहे. उन्हाळयाच्या सुटटया असल्याने विदयार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. प्रशिक्षण शिबिरामध्ये आकाश चौधरी कुस्तीचे आणि करण कोसरे वेटलिफटींगचे तंत्रशुदध प्रशिक्षण देणार आहेत. सदर ग्रीष्मकालिन प्रशिक्षण शिबिरासाठी 26 एप्रिल पासून नाव नोंदणीला सुरूवात झाली आहे.नाव नोंदणी कार्यालयातील प्रशांत आक्केवार यांच्या कडे करायची आहे.शालेय विदयार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन येथील तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे यांनी केले आहे.