स्पर्धेशिवाय उत्तूंग यश प्राप्त होत नाही – माजी मंत्री शोभाताई फडणवीस
मूल :- आजचे युग स्पर्धेचे आहे.यात टिकायचे असेल तर अधिक मेहनतीशिवाय पर्याय नाही.विदयार्थ्यांच्या भविष्याचा मार्ग सुकर करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. स्पर्धे मधूनच उत्तूंग यश प्राप्त करता येते असे मत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष,माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी व्यक्त केले.फडणवीस वाडा येथे गुरूवारी सकाळी घेण्यात आलेल्या गुणवंत विदयार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव अनिल संतोषवार,सहसचिव मोती टहलियानी,संचालक मंडळातील देवराजभाई पटेल,संजय चिंतावार,राजू पटेल,मुख्याध्यापक नितिन घरोटे उपस्थित होते. संस्थेतंर्गत असलेल्या स्वामी विवेकानंद विद्या मंदिर शाळेचा दहावीच्या परिक्षेचा निकाल 100 टक्के लागला. 115 विदयार्थी परिक्षेला बसले होते.त्यापैकी 47 विदयार्थी विशेष प्राविण्यासह पास झाले.41 विदयार्थ्यांनी प्रथम श्रेणीत यश संपादने केले.1992 मध्ये स्थापना झालेल्या या शाळेने दहावीच्या उत्कृष्ट निकालाची पंरपरा कायम राखली आहे.याचे संपूर्ण श्रेय शिक्षक वर्ग आणि व्यवस्थापन मंडळाचे असल्याचे शोभाताई फडणवीस यांनी यावेळी सांगितले. यशोशिखर प्राप्त केलेल्या आसावरी लेनगूरे (93.80 टक्के),सलोनी सुरमवार (93.76 टक्के),पूर्वा कानमपल्लीवार (92 टक्के),वंशिका चिताडे (90 टक्के) या चार विदयार्थीनींचा शाल,श्रीफळ देऊन शोभाताई फडणवीस आणि मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक नितिन घरोटे यांनी केले.यावेळी पालक वर्ग ,शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.