आमदार म्हणून निवडून आल्यास
मुलभूत सुविधांना प्रथम प्राधान्य
– संतोषसिंह रावत
नामांकन अर्ज सादर
मूल :- मी आमदार म्हणून निवडून आल्यास रस्ते,वीज,पाणी,आरोग्य,शिक्षण,सुरक्षा या मुलभूत सुविधांना प्रथम प्राधान्य देणार असे मत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार संतोषसिंह रावत यांनी मूल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. जनतेने मला सेवेची संधी दिल्यास या संधीचे मी सोने करीन.यावेळी त्यांनी आपली ध्येय धोरण, भूमिका स्पष्ट केली. बल्लारपूर विधानसभा मतदार संघात विविध मूलभूत सुविधांचा अभाव आहे.बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे.उच्च शिक्षणाची सोय नाही.आरोग्य सेवा ढेपाळली आहे.शेतकरी पीकविमाच्या लाभापासून वंचित आहेत.वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे येथील शेतकरी शेतमजूर हवालदिल झाला आहे.वाघाच्या वाढत्या हल्ल्यांमुळे मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचत आहे.अन्नधान्यांवर जीएसटी लागल्याने सर्वसामान्य भरडल्या जात आहे.घरकूल धारकांना निधीची चणचण आहे.रेती अभावी बांधकाम रखडले आहे.स्टॅम्प पेपरची किमंत वाढली आहे.वनविभागाच्या योजनांसाठी डिपीडीसी मध्ये निधीची टंचाई आहे.पुनर्वसन गावांचा विकास नाही.मतदार संघात अंधेर नगरी चौपट राजा अशी अवस्था झाली आहे.त्यामुळे सर्वसामान्य,मध्यमवर्गीयांच्या हितासाठी सर्वात प्रथम मुलभूत सुविधांना आपण आमदार म्हणून निवडून आल्यास प्राधान्या देवू. मतदार संघाच्या हितासाठी अनेक योजना प्रभावी पणे राबवू ,अशी ग्वाही संतोषसिंह रावत यांनी दिली.पत्रकार परिषदेला संदीप गडडमवार, सभापती राकेश रत्नावार,कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष गुरू गुरनूले,प्रकाश कागदेलवार,अशोक आक्केवार,बाबा अझिम, धनंजय चितांवार उपस्थित होते.
मला सहकार क्षेत्राचा दांडगा अभ्यास :- मूल नगर पालिकेचा अध्यक्ष,कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती,चंद्रपूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष इत्यादी पदांवर काम करताना मला ग्रामिण भागाचा मोठा अभ्यास आहे.आता चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा अध्यक्ष या नात्याने सहकार क्षेत्राचा दांडगा अभ्यास आहे.डबघाईस जात असलेल्या बॅंकेला उच्च स्थानावर आणण्याचे काम आपल्या कार्यकाळात होत आहे.यावर्षी चंजिमस बॅंकेला 95 कोटीचा लाभ मिळाला.त्यामुळे सभासदांना सहा टक्के लाभांष देण्याचे काम करण्यात आले.शेतकरी कल्याण निधी कल्याण योजना,राजीव गांधी स्वावलंबन योजना सुरू करून गरजूंना त्याचा लाभ देण्यात आला.बॅकेच्या वतीने कॅन्सर ग्रस्त रूग्णाना मदतीचा हात देण्यात आला.सहकार चळवळीत सातत्याने काम करीत असल्याने सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची मला जाण आहे.
कॉग्रेसचा सर्वधर्मसमभावाचा विचार आहे – कॉग्रेसचा सर्वधर्मसमभावाचा विचार आहे.सर्वांना समान न्याय हे धोरण आहे.त्यामुळे मी नामांकन अर्ज सादर करण्याच्या आधी सर्व प्रार्थना स्थळांना भेटी देवून आशीर्वाद घेतल्याचे संतोष रावत यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
विजय चिमडयालवार यांची कॉग्रेसमध्ये घरवापसी – कॉंग्रेसचे माजी नगराध्यक्ष विजय चिमडयालवार यांनी मध्यंतरीच्या काळात भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश घेतला होता. परंतु त्यांनी मंगळवारी कॉंग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करून घरवापसी केली.यावेळी संतोष सिंह रावत यांनी चिमडयालवार यांना गळयात दुपटटा घालून स्वागत केले.