दिवाळीची बाजारपेठ
आली माझ्या घरी…. दि.. दि.. दिवाळी, हे गाणे ऐकायला आले.वाटलं,इतक्या लवकर दिवाळी आली.आज तर दसरा आहे.आणि दिवाळी….!! डोक्यात एकदम चक्क प्रकाश पडला.कॅलेडंर पाहिल.तर,चक्क सोळा दिवसांवर दिवाळी असल्याचे कळले.
अरे बापरे…!! किती …किती काम. हे काम कराव,की ते काम आधी कराव.हे काम उरकाव,की ते काम आधी उरकाव….काही समजत नव्हतं.एकीकडे शाळेच्या प्रथम सत्र परीक्षा,दुसरीकडे पेपर तपासणे,तिसरी कडे इलेक्शन डयुटी … काय कराव ,काही समजायला मार्ग उरला नाही. मग,ऑफीसचा फोन,हे झालं का … ते झालं …का? अरे मगं आधी करायच काय? घरी मुलीची घाई.बाबा नवीन कपडे.ही म्हणायची…अहो दळण.उदया मला हातावरच्या चकल्या करायचे आहे.अगं, अगं थोडं थांब….एकदमच कशाला घाई करत आहे,असे मी म्हणालो.अहो ,तुम्हाला नाही समजत.आमच्या बायकांचं.आधीच तयारी करून ठेवावी लागते.
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी तुम्हीच म्हणाल,फराळ कुठाय. तुम्हा माणसांचं असच असतं.म्हणून आम्ही बायका मोठया हुशार असतो.आधीच तयारी करून ठेवतो.बर आहे बाबा,तुमचं. शाळे तून घरी आल्यावर मुलीची घाई सुरू.बाबा…चला ना… आज दुकानात जायचे म्हणजे जायचे … मला नवीन कपडे पाहिजे म्हणजे पाहिजे. आत्ताच चला. असं म्हणून तीने मला दम घेवू दिला नाही.बर बाबा म्हणत तीला थोडं समजावलं. थोड लाडावलं,तिचा थोडा पापा घेतला.हळू हळू तिला तुझा पेपर कसा गेला,हे विचारलं.छान गेला असं तिच उत्तर.चला आत्ता.अरे थांब चहा तर घेवू दे.हिने गुळ आणलेला चहा आणला.घेतला.थोडी पाठ टेकवली.तो पर्यंत मुलगी आपल्या सवंगडया सोबत खेळायला निघून गेली होती. थोडा उसावा वाटला.सुटलो बुवा असे वाटत असताना तुम्हा तोच ती घरी आल्यावर घाई चला आता.बर बाबा म्हणत मी,ही आणि धनश्री शॉपींगला निघालो.
खरच बाहेर पडल्यावर असं वाटायला लागलं… दिवाळी आली.खरचं दिवाळी आली.मनात माझ्या आनंदाच भरतं आलं.हीच्याही मनात आनंदाचे लहर उसळत होते.आणि धनश्री मनात तर काही विचारू नकाच.ति तर चक्क आनंदाने नाचतच होती.दुकाना ,दुकानामध्ये लागलेली विदयुत रोषणाई,चमचम पणा,झगमगाट,प्रचंड ओसंडून वाहत होता.बाजार पेठ सजली होती.कपडयांचा,रेडीमेटचा नवीन मॉल आलेला होता.कपडयाच्या दुकानाच्या समोर बाहूल्या नवीन कपडे घालून जणू मिरवतच होत्या.त्या बाहूल्यांकडे पाहतच रहावं असं वाटत होत.मी त्यात गुंग होणार तेव्हढयात हिने आवाज मारला.अहो… पुढे चला.असं म्हणताच मी पुढे निघालो.
काय ते कपडे ,काय ते कपडयाचे ढिगारे.या वरून एक वाक्य आठवलं.काय ते डोंगर ,काय ती झाडी….असो.मालकापेक्षा दुकानातला गडी माणूसच मोठा हौसी वाटत होता.साहेब,हे घ्या.यांच्या अंगावर एकदम उठावदार दिसेल.मुलीच्या अंगावर हे कपडे एकदम फिट बसतायत.असं म्हणून म्हणून त्याने काय ते घ्यायला लावलेच.आम्ही सुदधा ठिक आहे.हे दया ते दया असे म्हणून काय ती एकदायची खरेदी केली.एकदम डोक्यात चक्क प्रकाश पडावा तसं ही म्हणाली,अहो तुमचे कपडे राहिले.काही तरी घ्या.दुकानातल्या गडयाने सुदधा सुरात सुर मिसळवून मला ही माझे कपडे घ्यायला लावलेच.तसं मला एखादा खादीचा शर्ट घ्यायचा होता.पण हिच्या आग्रहा पुढे माझेही कपडे घेतले.फार छोटे नाही ,पण एकदम मोठेही नसलेले बील दिले.
परत रस्त्यावर दिवाळीचा माहौल कमी झालेला दिसत नव्हता.सगळीकडे झगझगाट दिसत होता.भाजीवाले आपले भाजीपाला विकत बसले होते.आमच्या भागात दुधी भरपूर मिळतात.त्यामुळ काही ठिकाणी दुधी विकायला बसले होते.कुठे सिताफळ विकायला बसले होते.फळांचे दुकान सजले होते.मिठाईचे दुकान रसरसीत वाटत होते.त्या हॉटेल मधला गोडवा चक्क जिबेवर रेंगाळत होता. एवढया घाई गर्दीत लिंबू विकायला एकजण खेडयातला व्यक्ती बसला होता.मी त्याला सहजच विचारलं.बाबा तु सुदधा.काय करू साहेब,उदया दिवाळी आहे.दोन पैसे हातात पडले तर, ते तेवढेच काय ते कामी येईल.घ्यायनं साहेब लिंबू असं म्हणताच मी त्यांचे कडून एक फळ लिंबू घेतले.वीस रूपये फळ.एका फळात पाच रसरसीत लिंबू होते.त्याचा आंबटपणा पाहून तोंडाला चक्क पाणीच आले.
पण काही म्हणा… दिवाळीचा सण आणि सजलेली बाजारपेठ पाहून वाटलं…खरचं दिवाळीत ऐवढे सारे असतं.दिवाळीची सजलेली बाजारपेठ पाहून ग्राहकांच्या उडया कुठे कश्या पडत होत्या.हे मी चक्क न्याहाळत होतं. आमच्या कडे बुधवारी आठवडी बाजार भरतो.त्या आठवडी बाजारात गाई गोधनाच्या वस्तू विकायला ठेवलेल्या होत्या.बरचं काही तर होत.पण ग्राहकांची गर्दी तर विचारूच नका.
खरचं,दिवाळी रोज असती तर… शेतकरी ,भाजीपाला उत्पादकांना चार पैसे या निमित्ताने जास्त मिळाले असते. मुख्य बाजार पेठेतली रोषनाई सदैव राहली असती. शहर उजळून निघाल असतं.सगळीकडे आनंदी,आनंदी वातावरण राहिले असते. मनात विचारांचे घोडे नाचत असताना,घरी कधी पोहचलो समजलं नाही.घरी आल्या आल्या …. परंत धनश्रीची टिवटिव सुरू झाली.हे कपडे लावून बघू ते कपडे लावून बघू …एकदाचे तिने आपले कपडे लावून बघितले.आम्हाला दाखविले.खुप छान म्हणून … आम्ही आनंदी झालो. जेवणावर ताव मारला. झोप झाली.दुसरा दिवस उजाळला.परत कुठून तरी माझ्या कानावर आवाज पडला..,आली माझ्या घरी दि.. दि.. दिवाळी…..
श्री.विनायक रेकलवार,मूल
लेखक
8975140998