विकासाची भाषा बोलणा-यांनी युवकांना रोजगारापासुन वंचित ठेवले – चंदुपाटील मारकवार यांचा आरोप

35

विकासाची भाषा बोलणा-यांनी युवकांना रोजगारापासुन वंचित ठेवले

चंदुपाटील मारकवार यांचा आरोप

मूल : विकासाची भाषा बोलणा-यांनी तालुक्यातील युवकांना रोजगार दिला नाही, सिंचनाच्या सोयी पासून शेतक-यांना वंचित ठेवले, याउलट संतोषसिंह रावत यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या माध्यमातून शेतक-यांना मदतीचा हात दिला, बेरोजगारांना रोजगारांसाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देवून अनेकांचा संसार उभा केला. आजपर्यंत भुषविलेल्या पदांमूळे रावत यांना जनतेच्या अडीअडचणींची जाणीव असून जनतेचे हित आणि विकासाचा दृष्टीकोन आहे. असे मत आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त राजगडचे उपसरपंच चंदुपाटील मारकवार यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील चिमढा, टेकाडी, मारोडा, राजोली आदि गावांत झालेल्या झंझावती जनसंपर्क दौ-यात नागरीकांशी संवाद साधतांना पार पडलेल्या छोटेखानी सभेत चंदुपाटील मारकवार बोलत होते. बल्लारपूर आणि चंद्रपूर तालुक्यातील काही गावांचा प्रचार दौरा आटोपून दुपार पासून तालुक्यात झंझावती प्रचार सुरू केला. प्रचारा दरम्यान उमेदवार संतोषसिंह रावत यानी तालुक्यातील चिमढा येथे नागरीकांशी संवाद साधला. टेकाडी येथील भेटी दरम्यान झालेल्या छोटेखानी सभेत सावली पंचायत समितीचे माजी सभापती मोतीलाल दुधे यांनी विद्यमान शासन आणि लोकप्रतिनिधींच्या अनागोंधी कारभाराचे अनेक दाखले देत भावी आमदार हा संतोष रावत यांच्या सारखा स्वच्छ प्रतिमेचा असावा. अशी अपेक्षा व्यक्त केली. मारोडा येथे पार पडलेल्या जनसंपर्क अभियानात शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गि-हे, चंदुपाटील मारकवार, माजी सभापती वैशाली पुल्लकवार, अशोक पुल्लकवार आदि उपस्थित होते. राजोली येथे पार पडलेल्या काॅर्नर सभेत आदिवासी नेते संपत कन्नाके आणि काॅंग्रेसच्या ओबीसी आघाडीचे राज्य सरचिटणीस गुरू चौधरी, विद्यमान महायुती सरकार हे शेतकरी आणि युवक विरोधी असून जीएसटीच्या नांवाखाली सामान्य नागरीकांची पिळवणुक करीत असल्याचा आरोप केला. यावेळी सरपंच जितेंद्र लोणारे, सुनिल गुज्जनवार, शाम पुट्टावार, शितल पंदिलवार, मोहम्मद शरीफभाई उपस्थित होते. यावेळी ग्राम पंचायत सदस्य गोपाल सोनुले, नितेश सोयाम, गोपाल मांदाडे यांनी भाजपाला सोडचिट्टी देत संतोष रावत यांचे नेतृत्वात काॅंग्रेस मध्यें प्रवेश केला. मोरवाही येथेही प्रचार अभियान राबविण्यात आले. यावेळी साईनाथ गेडेकर, सरपंच अनुराधा नेवारे, नंदकिशोर रायपुरे, दुमाजी मडावी यांचेसह ग्रामस्थ मोठया संख्येनी उपस्थित होते. संतोषसिंह रावत यांनी केलेल्या काॅंग्रेसला मतदान करण्याच्या विनंतीला ग्रामस्थांनीही प्रचंड प्रतिसाद दिला.

*महाविकास आघाडीचा युती धर्म पाळत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोषसिंह रावत यांच्या निवडणुक प्रचारार्थ राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष समीर समर्थ, महिला जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके, तालुकाध्यक्ष निता गेडाम, शहर अध्यक्ष अर्चना चावरे यांचेसह राष्ट्रवादीचे शेकडो पदाधिकारी आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गि-हे यांचे नेतृत्वात शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार, शहर अध्यक्ष बादल करपे, महेश चौधरी आदी पदाधिकारी सुध्दा महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ परीश्रम घेत असून गावांगावांत कार्नर सभेच्या माध्यमातून संतोष रावत यांना विजयी करण्याचे आवाहन करीत आहेत.*