वाघाच्या हल्ल्यात मेंढपाळ ठार – फिस्कुटी येथील घटना

41
  • वाघाच्या हल्ल्यात मेंढपाळ ठार
    फिस्कुटी येथील घटना
    मूलः- वाघाच्या हल्ल्यात मेंढपाळ ठार झाल्याची घटना तालुक्यातील फिस्कुटी येथे गुरूवारी रात्री एक वाजताच्या दरम्यान घडली.जुनासूर्ला येथील या मेंढपाळाचे नाव वासूदेव गणपत कंकलवार ,वय 36 वर्षे असे आहे.घटनास्थळी पोंभूर्णा वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. घटनेेने शेतशिवारातील मेंढपाळामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वासूदेव कंकलवार हा फिस्कूटी येथे आपल्या मेंढयाच्या कळपासह शेतशिवारात मुक्कामी होता.त्याच्या सोबत त्याची पत्नी आणि भावाचे कुटंुब सुदधा होते. शेतबांध्यामध्ये मेंढयांचे कळप बसवून त्यातून या मेंढपाळाचे उदरनिर्वाह चालत असतो. फिस्कुटी येथील महाकाली मंदीराजवळील शेतशिवारात रात्रोस मेंढयांना जाळी मध्ये बसवून एका शेतबांधीमध्ये हा एकटा झोपला असताना त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून त्यास ठार केले.दुस-या बांधी त्याचा भाऊ आणि त्याची पत्नी झोपलेली होती.त्याच दिवशी वासूदेवची पत्नी ही जुनासूर्ला येथे गावाला गेल्या मुळे ती वाचली. तथा जाळीतील मेंढयांना वाघाने कोणतीही इजा केली नाही. या घटनेने शेतशिवारातील मेंढपाळामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मूल तालुक्यातील फिस्कुटी येथील वनक्षेत्र पोंभूर्णा वनक्षेत्रात येत असल्याने येथिल वन अधिकारी आणि कर्मचा-यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.मृतदेह शवविच्छेदनासाठी  उपजिल्हा रूग्णालयात रात्रीस पाठविले.मृतकाच्या कुटुंबीयांनी तातडीची पन्नास हजार रूपयांची मदत करण्यात आली. फिस्कुटी परिसरात गडीसूर्ला,राजगड,चांदापूर या मार्गाने वाघाची भटकंती असल्याने परिसरात वाघाची भिती निर्माण झाली आहे. नुकतेच मूल तालुक्यातील सोमनाथ आमटे फार्म येथील शेतशिवारात कापूस तोडणा-या शेतमजूर महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले होते.त्यानंतर ची ही दुसरी घटना आहे.वाघाच्या वाढत्या हल्ल्यामुळे तालुक्यात शेतकरी,शेतमजूर,मंेढपाळ आणि गुराख्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.