शिक्षण हे व्यवसायभिमूख असले पाहिजे -मान्यवरांचे मत
दोन दिवशीय व्यावसायिक शिक्षण व उद्योजकता कार्यशाळा
मूल:- नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण हे व्यवसायभिमूख असले पाहिजे असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.सावली येथील विश्वशांती विदयालयात दोन दिवशीय व्यावसायिक शिक्षण व उद्योजकता कार्यशाळा पार पडली.शिक्षण विभाग पंचायत समिती सावली यांच्या अंतर्गत आयोजित कार्यशाळेचे उदघाटन मुख्याध्यापक रविंद्र मुप्पावार यांच्या हस्ते करण्यात आले.तालुका समन्वयक तथा केंद्रप्रमूख बोरेवार,मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष लोखंडे,उपाध्यक्ष किरण खोब्रागडे,तज्ज्ञ मार्गदर्शक विनोद मानापूरे आणि रविंद्र कुडकावार इत्यादींची प्रमूख उपस्थिती होती.शिक्षण आणि रोजगार यांच्यातील दरी कमी करण्यासाठी आणि भविष्यात विदयार्थ्यांना करिअर मार्गदर्शनाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी या कार्यशाळेचे आयोजन असल्याची भूमिका तज्ज्ञांनी व्यक्त केले.कार्यशाळेच्या माध्यमातून समुपदेशन,विदयार्थ्यांना उदभवणा-या समस्या,राष्टीय शैक्षणिक धोरणाची उद्यिष्टये,आवड,क्षमता,संधी,तमन्ना अॅप्स,करिअर मार्गदर्शन,गेटकिपर प्रशिक्षण यावर सांगोपांग चर्चा करण्यात आली.दोन दिवशीय कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून रविंद्र कुडकावार आणि विनोद मानापूरे यांनी आपली भूमिका यशस्वीरित्या पार पाडली.समारोपीय कार्यक्रम गटशिक्षणाधिकारी वैभव खांडरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.यावेळी प्रशिक्षकांनी आपले मनोगत सादर केले. यावेळी कार्यक्रमाचे संचालन सहा.शिक्षक विनायक रेकलवार यांनी तर उपस्थितांचे आभार तज्ज्ञ मार्गदर्शक रविंद्र कुडकावार यांनी मानले.कार्यशाळेला तालुक्यातील माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आणि सहा,शिक्षक उपस्थित होते.