जंगल वाचविणे आणि निसर्गाचे संरक्षण करणे काळाची गरज – बंडू धोतरे
रिंगदेव तलाव येथे जागतिक वन दिन कार्यक्रम उत्साहात साजरा
मूल:- निसर्गाची ताकद अफाट आहे. त्यामुळेच आपल्या मूलभूत गरजा पूर्ण होत आहेत.ही ताकद कायम राहण्यासाठी आपल्याला निसर्गाचे पर्यायाने जंगलाचे संरक्षण करणे काळाची गरज ठरणार आहे.असे प्रतिपादन प्रसिदध वन्यजीव अभ्यासक आणि इको प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केले. सावली येथील प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालयातंर्गत घेण्यात आलेल्या जागतिक वन दिन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.सादागड बिटाअंतर्गत असलेल्या रिंगदेव तलाव येथे शनिवारी ( 21मार्च ) जागतिक वन दिन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनपरिक्षेत्राधिकारी विनोद धुर्वे हे होते.प्रमूख पाहूणे म्हणून सुरकर विदयालयाचे मुख्याध्यापक के.व्ही.खोब्रागडे,कवठीचे सरपंच कांताबाई बोरकुटे,उपसरपंच राकेश घोटेकार,क्षेत्र सहायक सिडाम,इको प्रोचे कार्यकर्ते अभय अमृतकर,संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंदू गेडाम,सहा.शिक्षक व्हि.डी.हजारे,विनायक रेकलवार,कु.एल.के.सलामे आदींची प्रमूख उपस्थिती होती.जागतिक वनदिनाच्या निमित्ताने शहीद सुरेश पाटिल सुरकर विदयालयाच्या विदयार्थ्यांना सादागड जंगलात असलेल्या रिंगदेव तलाव परिसराची माहिती,वन क्षेत्राची माहिती,पक्ष्यांची ओळख करून देण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष वनपरिक्षेत्राधिकारी विनोद धुर्वे यांनी विदयार्थ्यांना पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे आवाहन केले.हे आपले संवैधानिक कर्तव्य असून एकप्रकारे देशसेवा असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी विदयार्थ्यानी तलावाची पाहणी केली.येथे मुक्तपणे वावरणा-या निलगायींचे त्यांना दर्शन घेता आले.तसेच विविध पक्षी त्यांना जवळून पाहता आले. विदयार्थ्यांशी हितगुज करताना क्षेत्र सहायक सिडाम यांनी विदयार्थ्यांना जंगलाविषयी सविस्तर माहिती सांगितली. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार वनरक्षक मुरकुटे यांनी केले.कार्यक्रमास वनरक्षक आखाडे,बोनलवार,वन कर्मचारी सतिश मजोेके,बंडू दुधे,पीआरटी कर्मचारी,मदतनिश आणि सुरकर विदयालयाचे विदयार्थी,विदयार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.