गॅस एजन्सीविना असलेल्या मूल तालुक्यात गॅस एजन्सी सुरू करावी – काँग्रेसच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी यांना विनंती

93

गॅस एजन्सीविना असलेल्या मूल तालुक्यात गॅस एजन्सी सुरू करावी

काँग्रेसच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी यांना विनंती

मूल : विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असलेला मूल तालुका मागील काही महिण्यांपासून गॅस एजन्सी विना असुन मूल तालुक्यातील गॅस सिलींडर धारकांना सावली आणि चिचपल्ली येथील गॅस एजन्सीमधुन गॅस सिलींडर उपलब्ध करून घ्यावा लागत आहे. त्यामूळे सव्वा लाख लोकसंख्येच्या मूल तालुक्यात नवीन गॅस एजन्सी सुरू करावी किंवा जुनी गँस एजन्सी पुर्ववत सुरू करून ग्राहकांना दिलासा दयावा. अशी विनंती काॅंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना केली.

चंद्रपूर जिल्हयाच्या मध्यभागी असलेला मूल तालुका धानाची बाजारपेठ म्हणून परिचीत आहे. 106 गावांचा समावेश असलेल्या मूल तालुक्यात 49 ग्राम पंचायती आणि 1 नगर परिषद असून शासनाचे सर्व कार्यालये, उच्च शिक्षण संस्था, उपजिल्हा रूग्णालय, औद्योगीक वसाहत या ठिकाणी कार्यान्वीत आहेत. दिड लाखाचे वर लोकसंख्या असलेल्या मूल तालुक्यात आजस्थितीत 20 हजाराचे वर गॅस वापरणारे कुटूंब आहेत. तालुक्यातील गॅस वापरणा-या ग्राहकांची संख्या लक्षात घेवून शासनाच्या परवानगीने 2009 मध्यें मूल येथे हिेदुस्थान पेट्रोलीयमची गॅस एजन्सी कार्यान्वीत झाली. मूल येथे एचपी गॅस एजन्सी सुरू होण्यापूर्वी तालुक्यातील गॅस ग्राहकांना अन्य ठिकाणाहून गॅस सिलींडर आणावे लागत होते. परंतू 2009 पासून येथील गॅस ग्राहकांना मूल येथून गॅस सिलींडर उपलब्ध होवू लागल्याने तालुक्यातील गॅस वापरणा-या ग्राहकांची संख्या आपसुकच वाढली. प्रधानमंत्री उज्वला योजना व शासनाच्या अन्य योजनां अंतर्गत मोफत आणि अनुदान तत्वावर गॅस वापरणारे गरीब कुटूंबही तालुक्यात मोठया संख्येने आहेत. त्यामूळे सध्यास्थितीत मूल तालुक्यात 20 हजाराचे वर गॅस ग्राहक असून एकटया मूल शहरात 3 हजारापेक्षा जास्त ग्राहक आहेत. परंतू मागील काही महिण्यांपासून हजारोच्या संख्येने असलेले तालुक्यातील गॅस सिलींडर ग्राहक गॅस एजन्सीविना त्रस्त आहेत. तालुक्यातीला गॅस एजन्सी तांत्रिक काराणांमूळे बंद केल्यानंतर तालुक्यातील हजारो गॅस ग्राहकांची गैरसोय होवू नये म्हणून मूल शहर आणि तालुक्यातील काही गांवातील ग्राहक मूल पासून 12 कि.मी.अंतरावर असलेल्या सावली येथील रेयांश गॅस एजन्सी आणि काही गांवातील ग्राहक 22 कि.मी. अंतरावर असलेल्या चिचपल्ली येथील क्रिष्णा ग्रामीण गॅस एजन्सीला जोडून गॅस ग्राहकांना सिलींडर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सोपविली आहे. मूल शहर आणि तालुक्यातील गॅस ग्राहकांना सध्यास्थितीत दुस-या गावांतील गॅस एजन्सीवर अवलंबुन राहावे लागत असल्यामूळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस सिलींडर टंचाईचा सध्याच्या परिस्थितीत तालुक्यातील गँस सिलींडर धारकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामूळे दिड लाख लोकसंख्येच्या मूल तालुक्यातील जवळपास 20 हजार गॅस ग्राहकांना घरगुती एलपीजी सिलींडर उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने तीन गॅस कंपन्यापैकी कोणत्याही एक किंवा दोन कंपन्यांची गॅस एजन्सी मंजुर करावी किंवा बंद करण्यात आलेली संजय गँस फ्लेम पुर्ववत सुरू करून ग्राहकांना दिलासा दयावा. अशी विनंती काॅंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली. यावेळी नगर परीषद उपाध्यक्ष तथा बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, काँग्रेस तालुकाध्यक्ष गुरू गुरनुले, बाजार समिती संचालक घनश्याम येनुरकर, संदीप कारमवार आणि राजु मारकवार आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी अडचणींची दखल घेवुन तात्काळ कार्यवाही करण्यात येईल. असे आश्वासन दिले.