राज्याच्या वनमंत्र्यांनी राजीनामा दयावा – जाहिर सभेत खा.प्रतिभा धानोरकर कडाडल्या

295
राज्याच्या वनमंत्र्यांनी राजीनामा दयावा
जाहिर सभेत खा.प्रतिभा धानोरकर कडाडल्या
मूल :- बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार राज्याचे वनमंत्री असताना सुदधा तालुक्यातील वनांच्या संदर्भातील समस्या सुटलेल्या नाही.मानव वन्यजीव संघर्ष कमी झालेला नाही.त्यामुळे राज्याच्या वनमंत्र्यांनी राजीनामा दयावा,असे प्रतिपादन नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले. मूल येथील गांधी चौकात तालुका  कॉंग्रेस पक्षातर्फे त्यांचा शाल, श्रीफळ,सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्या बोलत हौत्या. वनांच्या संदर्भात अनेक समस्या उदभवल्या असताना वनमंत्री त्यावर कोणत्याच उपाय योजना आखताना दिसत नाही,अशी टिका त्यांनी यावेळी केली. वन्यप्राण्यांच्या रोजच्या हल्ल्यामुळे शेतकरी ,शेतमजूर आणि गुराख्यां मध्ये भितीचे वातावरण आहे.ही भिती दूर कोण करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.त्याबाबत वरिष्ठ वन  अधिका-यांची लवकरच बैठक बोलावून यावर तोडगा काढला जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.जिल्हयात सुडबुदधीचे राजकारण केल्या जात आहे. क्षेत्राच्या विकासासाठी आपल्या हक्काचा आमदार आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.लोकसभेचे क्षेत्र मोठे असल्याने या क्षेत्राच्या विकास कामांसाठी केंद्र शासनाने प्रत्येक खासदाराचा निधी तीस कोटी र्प्यंत वाढवून दयावा ,अशी इच्छा त्यांनी यावेळी बोलून दाखविली.सत्काराला उत्तर देताना त्यांनी मतदारांच्या विश्वासाला तडा जाणार नाही,असा शब्द दिला.मतदारांनी आपल्या कडे हक्काने आपले प्रश्न मांडावेत असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.सुभाष धोटे हे होते.प्रमूख पाहूणे म्हणून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत,आ.अभिजीत वंजारी,माजी आ.देवराव भांडेकर,घनश्याम मुलचंदानी,माजी जि.प.अध्यक्ष प्रकाश मारकवार,अभिलाषा गावतूरे,सभापती राकेश रत्नावार,तालुका अध्यक्ष गुरू गुरनूले,रूपाली संतोषवार,मंगला आत्राम उपस्थित होते.प्रास्ताविक तालुका अध्यक्ष गुरू गुरनूले यांनी केले. यावेळी संतोषसिंह रावत यांनी निधी अभावी ग्रामपंचायत क्षेत्रातील विकास ठप्प आहे. अशा ग्रामपंचायतींना न्याय देण्याची मागणी केली.रोज होणारे मानव वन्यजीव संघर्ष,धनगरांचा चराईचा प्रश्न,वनहक्क,वन पटटे,रानडुक्करांमुळे होणारे शेतपीकांचे नुकसान आदी समस्या रावत यांनी खासदारांपुढे मांडल्या. यावेळी आ.अभिजीत वंजारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. राज्यात मविआचे सरकार आल्यास  लाडकी बहिण योजना आम्ही बंद करणार नाही.उलट तीन हजारांऐवजी पाच हजार रूपये प्रत्येकी देवू अशी ग्वाही आ.सुभाष धोटे यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना दिली. यावेळी मूल येथील काही युवकांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाचे संचालन सुनिल शेरकी यांनी ,तर आभार नलिनी आडेपवार यानी मानले. सभेला मविआ घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.