बस मध्ये चढताना अठरा हजार रूपये लंपास
दोन आरोपींना चोविस तासात अटक,मूल येथील घटना
मूल:-चामोर्शी कडे जाणा-या बस मध्ये चढताना एका व्यक्तीच्या पॅंटच्या खिश्यातून अठरा हजार रूपये अज्ञात चोरांनी लंपास केले.या प्रकरणी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली.मूल पोलिसांनी चोविस तासाच्या आत या गुन्हयात दोन आरोपींना अटक केली. आरोपींचा पोलिस कस्टडी रिमंाड घेण्यात आला आहे.ही घटना शनिवारी येथील बसस्थानकावर घडली. मूल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गडचिरोली जिल्हयातील चामोर्शी येथिल तक्रारदार यशवंत बाबूराव भरणे हे चंद्रपूर येथे अठरा हजार रूपये भरण्यासाठी गेले होते.पंरतु ,शनिवारी कार्यालय बंद असल्याने ते परत मूल येथील बसस्थानकावर आले.येथून चामोर्शी कडे जाणा-या बस मध्ये चढत असताना त्यांच्या पॅंटच्या खिश्यातून अज्ञात पॉकीटमाराने अठरा हजार रूपये लंपास केले.ही बाब भरणे यांच्या लक्षात आली.त्यांनी तात्काळ मूल पोलिस ठाणे गाठून झालेल्या घटनेची फिर्याद नोंदविली. गोपनिय माहितीच्या आधारे आणि मूल पोलिसांच्या गस्ती दरम्यान या गुन्हयातील शरद वाघोजी रूयारकर वय 43 रा.वरोरा यास मूल बस स्थानक परिसरातून ताब्यात घेवून अटक केली.त्याचा दुसरा फरार साथिदार ज्ञानेश्वर नाना गुलाब मडावी वय 53 वर्षे यास रविवारी सकाळी वरोरा येथून अटक केली.त्यांचे कडून चोरी केलेली अठरा हजार रूपयंाची रक्कम जप्त करण्यात आली. दोन्ही आरोपींचा पोलिस कस्टडी रिमांड घेण्यात आला आहे.दोन्ही आरोपींविरूदध इतर पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत.त्यांच्या कडून इतर जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. यशवंत भरणे यांच्या तक्रारीवरून आरोपींविरूदध मूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनााखाली प्रभारी पोलिस निरिक्षक सुबोध वंजारी ,डीबी पथकाचे भोजराज मुंढरे,जमीर पठाण,चिमाजी देवकाते,नरेश कोडापे हे करीत आहेत.