निलंबित तालुका कृषी अधिकारी विरूदध शासनाने बडतर्फची कारवाई करावी  – संध्याताई गुरनूले यांची मागणी

131
निलंबित तालुका कृषी अधिकारी विरूदध शासनाने बडतर्फची कारवाई करावी  – संध्याताई गुरनूले यांची मागणी
मंत्रालयाने केली कासराळे यांच्या विरूदध शिस्तभंगाची व निलंबनाची कारवाई
मूल
 :- महिलांच्या लैगिंग छळाच्या आरोपाखाली निलंबित झालेले  येथील तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे यांच्या विरूदध राज्य शासनाने आता बडतर्फची कारवाई करावी अशी मागणी  भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा महामंत्री तथा माजी जि.प.अध्यक्षा संध्याताई गुरनूले यांनी केली. मूल येथील विश्राम गृहात घेतलेल्या  पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य शासनाच्या 14 ऑगस्टच्या आदेशाचे स्वागत केले. पिडीत महिलेला पूर्ण न्याय मिळण्यासाठी शासनाने अधिका-याविरूदध बडतर्फची कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.    राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मंत्रालयाने कासराळे यांच्या विरूदध शिस्तभंगाची व निलंबनाची कारवाई केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. महाराष्ट नागरी सेवा (शिस्त व अपील ) नियम 1979 च्या नियम 4(1) (क) अन्वये कासराळे यांना तात्काळ निलंबित केले आहे. एका महिला कर्मचा-याचा त्यांनी लैगिंग छळ केला. पिडीत महिलेने पोलिस ठाणे मूल,वरिष्ठ अधिकारी,महिला तक्रार निवारण समिती आणि माझया कडे लेखी तक्रार दिली होती, असे  संध्याताई गुरनूले यांनी सांगितले. या संदर्भात मूल पोलिस स्टेशन मध्ये कासराळे यांच्या विरूदध गुन्हा नोंद आहे.तसेच महिला कर्मचा-याला न्याय मिळावा यासाठी जिल्हयाचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार आणि कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या कडे हा प्रश्न लावून धरला होता. मंत्रालयात याबाबत पाठपुरावा केला. तक्रारीच्या अनुषंगाने तपासी अधिका-यांनी सत्यता पडताळून पाहल्या नंतर कासराळे यांच्या विरूदध राज्य शासनाने कारवाई केली आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने  कोणत्याही महिलेवरचा अन्याय अत्याचार खपवून घेतला जाणार नाही. शासकीय,निमशासकीय कार्यालयातील तथा सर्वसामान्य असलेल्या प्रत्येक महिलेला न्याय हा मिळालाच पाहिजे.ही आमची भूमिका असल्याचे मत संध्याताईंनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे ,शिस्तभंगाच्या कारवाईच्या पुढे जावून  राज्य शासनाने प्रशांत कासराळे यांच्या विरूदध आता  बडतर्फची कारवाई करावी. भाजपाचे जिल्हा महामंत्री या नात्याने ही आमची भूमिका आणि मागणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याबाबत लवकरच मंत्रालयात जावून वरिष्ठ अधिका-यांना एक निवेदन देण्यात येणार असल्याचे संध्याताई गुरनूले म्हणाल्या. पत्रकार परिषदेला भाजपाच्या जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा वंदना शेंडे,बजरंग दलाचे जिल्हा संयोजक विपीन भालेराव, भाजपाचे पदाधिकारी अमोल चुदरी,लोकनाथ नर्मलवार,प्रशांत बोबाटे,साहिल येनगंटीवार,प्रशांत कोहळे,प्रशांत बांबोळे उपस्थित होते.

जिल्हा कृषी अधिकारी यांची भूमिका संशयास्पद :- जिल्हा कृषी अधिकारी तोटावार यांच्या कडे आम्ही महिला लैगिंग छळाच्या संदर्भात तीनदा भेटलो. तीनही वेळेस त्यांची भूमिका संशयास्पद राहिली आहे.त्यांनी प्रत्येक वेळी उडवाउडवीचे उत्तर दिले.कासराळे यांना वाचविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे जिल्हा कृषी अधिकारी यांचीही शासनाने चौकशी करून त्यांच्या विरूदध कारवाई करावी ,असे संध्याताई गुरनूले म्हणाल्या.

सावली,सिंदेवाही येथे या अधिका-याला नाकारले :- लैगिंग छळाच्या आरोपाखाली गुन्हा नोंद झाल्यानंतर तालुका कृषी अधिकारी कासराळे यांची सावली आणि सिंदेवाही येथे बदली करण्यात आली होती.परंतु , या कार्यालयातील महिला कर्मचा-यांनी आणि इतर कर्मचा-यांनी या अधिका-याला नाकारले. आम्हाला हा अधिकारी नको म्हणत महिलांनी वरिष्ठाकडे निवेदन करीत दुसरा अधिकारी देण्याची मागणी केली होती.असे पत्रकार परिषदेत संध्याताई गुरनूले यांनी सांगितले.