मूल नगर पालिकेतर्फे स्वातंत्र्य दिना निमित्त देशभक्तीपर गीतगायन आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन

22
मूल नगर पालिकेतर्फे स्वातंत्र्य दिना निमित्त
देशभक्तीपर गीतगायन आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन
माजी सैनिक आणि स्वच्छता दुतांचा सत्कार
मूल
:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव आणि हर घर तिरंगा 2024 अंतर्गत मूल नगर पालिकेतर्फे देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा घेण्यात आली.येथिल मा.सा.कन्नमवार संास्कृतिक सभागृहात पार पडलेल्या या स्पर्धेला विदयार्थ्यांनी उत्स्फुर्त पणे प्रतिसाद दिला.याप्रसंगी तिरंगा ट्री ब्युट कार्यक्रम सुदधा घेण्यात आला.कार्यक्रमाचे उदघाटन उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक विशालकुमार मेश्राम यांनी केले.प्रमुख अतिथी म्हणून तहसिलदार मृदूला मोरे,नायब तहसिलदार नंदकिशोर कुमरे ,नायब तहसिलदार विजय पंदिले, नायब तहसिलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी यशवंत पवार,नंदकिशोर रणदिवे,राजू गेडाम,विजय सिदधावार यांची प्रमूख उपस्थिती होती. देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेमध्ये खुला गटात अश्विनी रणदिवे,काजल दुधे, शुभांगी मोहबंशी,सरीता बुटले,वर्ग 8 ते 10 गटात निलिमा मोहूर्ले,अंश तेलसे,पुष्पक नावबकर,लक्ष्मी कवाडे, वर्ग 5 ते 7 वी गटात मनस्वी चटारे, श्रीकांत मुत्यालवार,त्रिशू शेंडे तर 1 ली ते 4 थी वर्ग गटात अंश आगडे,अर्णव मेश्राम ,विक्रम नरूले ,युतिका खोब्रागडे,रिदधी आगडे यांनी पारितोषिके पटकाविली.यावेळी चित्रकला स्पर्धे तील आणि पर्यावरण स्नेही गणेश स्पर्धा 2023 मधील विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.चित्रकला स्पर्धेचे परिक्षण भारत सलाम आणि गीतगायन स्पर्धेचे परिक्षण अशोक येरमे,अमोल तिग्गलवार,संतोषी बत्तूलवार यांनी केले.मूल नगर पालिकेतर्फे 12 ते 15 ऑगस्ट पर्यंत हर घर तिरंगा उपक्रम सुदधा राबविण्यात आला. यावेळी माजी सैनिकांचा सत्कार,सामाजिक संस्था  आणि स्वच्छता दुतांचा सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार मंडळी,गावकरी,विदयार्थी,विदयार्थीनी यांची मोठी उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याधिकारी यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नगर पालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी वर्गांनी मोठे परिश्रम घेतले.