बातमीचा परिणाम – 15 वे वित्त आयोगाचा निधी मिळण्याचा मार्ग झाला मोकळा

20

भाग – 3

बातमीचा परिणाम
15 वे वित्त आयोगाचा निधी मिळण्याचा मार्ग झाला मोकळा
मूल:- नगर परिषदांना मिळणा-या 15 वे वित्त आयोगाचा निधी चा मार्ग मोकळा झाला आहे.जिल्हयाचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांना केंद्राचे अर्थ मंत्री निर्मला सितारामन यांनी स्वत: दुरध्वनी द्वारे संपर्क करून निधी देत असल्याची माहिती दिली. याबाबत नुकतेच 15 वे वित्त आयोगाच्या निधी बाबत बातमी प्रसिदध केली होती.त्याच्या दुस-याच दिवशी बातमीचा असर झाला.
निधी मुळे राज्यातील विविध विकास कामाचा मार्ग सुकर झाला.
महाराष्ट्रातील 15 व्या वित्त आयोगाच्या अनुषंगाने मिळणाऱ्या निधीचा मार्ग वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यावासाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत पुढाकार घेतला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वतः फोन करून महाराष्ट्राला 401 कोटीचे थकीत अनुदान देत असल्याची माहिती ना. मुनगंटीवार यांना दिली.

केंद्र शासनाकडून 15 व्या वित्त आयोगाच्या अनुषंगाने महाराष्ट्राला मिळणारे सन 2023-24 चे नगरपालिका प्रशासन व नगर परिषदांसाठीचे अनुदान थकित होते. सदर अनुदान महाराष्ट्र शासनाच्या विविध नगरपालिका व नगर परिषदांकरिता अत्यंत आवश्यक होते. या निधी अभावी नगरपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिका अशा एकूण 421 ठिकाणी विविध विकास कार्य रखडलेली होती.

सदर निधी मिळवण्याकरिता राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सितारामन यांना पत्र लिहून आणि दूरध्वनीद्वारे महाराष्ट्र राज्यातील विकास कामांकरिता या निधीची किती आवश्यकता आहे, हे कळविले होते. यासंदर्भात पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सतत पाठपुरावा केला.

म्हणूनच महाराष्ट्राचा केंद्राकडे वित्त आयोगाच्या अनुषंगाने सन 2023-24 चा निधी मिळवून नगरपालिका प्रशासन व नगर परिषदांकरिता मिळणाऱ्या अनुदानाचा विषय मार्गी लागावा, असा त्यांचा आग्रह होता. सदरचे अनुदान महाराष्ट्र शासनाच्या विविध नगरपालिका व नगर परिषदांकरिता अत्यंत आवश्यक होते. या निधी अभावी नगरपंचायती, नगरपालिका आणि महानगर पालिकामध्ये विविध विकास कार्य रखडलेली होती. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या या निर्णयामुळे व मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्राला दिलासा मिळाला आहे.