अवैध दारूच्या विरोधात महिला आक्रमक
येरगाव समस्याच्या विळख्यात,पोलिसांचे दुर्लक्ष
मूल :- तालुक्यातील येरगाव अवैध दारूचे माहेरघर झाले आहे.ठिकठिकाणी मिळणा-या अवैध दारू मुळे गावात अशांतता निर्माण झाली.त्याविरूदध येथील चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.ग्रामसभेत ठराव घेत त्यांनी अवैध दारू विरोधात कंबर कसली. महिला दारूबंदी समिती स्थापन केली. मूल येथील पोलिस ठाण्यात आणि तहसिल कार्यालयात निवेदन सादर करून अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली. अवैध दारू मुळे येरगाव येथील अनेकांचे संसार उदध्वस्त झाले.सामाजिक स्वास्थ बिघडले.अशांतता निर्माण झाली.त्याचा परिणाम गृहीणीच्या संसारावर आणि विदयार्थ्यांच्या शिक्षणावर झाला.जुगार अडडे निर्माण झाले.त्यामुळे येथील महिला एकत्र येत याविरूदध एल्गार पुकारण्यासाठी कंबर कसली. ग्रामसभेत गावातील अवैध दारू विक्री आणि अवैध चालणा-या जुगाराविरोधात ठराव पारित केला. महिला दारूबंदी समितीच्या वतीने ठरावाची प्रत निवेदनाला जोडून त्यांनी मूल तहसिल कार्यालय आणि पोलिस ठाण्यात दिले.यावेळी येरगावातील शेकडो महिला उपस्थित होत्या.गावातील शांतता आणि सुव्यवस्था बिघडवणा-या समाजकंटकाविरूदध कडक कारवाईची मागणी केली.अवैध दारूविक्री आणि जुगार खेळणा-या इसमांना वैयक्तीक आणि शासकीय कोणत्याही योजनेचा लाभ देवू नये,अशी मागणी त्यांनी तहसिलदार यांच्या कडे केली. मूल पोलिस अवैध दारूची विक्री करणा-यांविरूदध कोणती कारवाई करते याकडे येरगाव वासियांचे लक्ष लागले आहे.
पोलिसांचे दुर्लक्ष :- येरगाव मध्ये मोठया प्रमाणात अवैध दारूची विक्री कित्येक महिण्यांपासून होत आहे. ठिकठिकाणी अवैध दारू विक्री होते.याचा परिणाम शाळकरी विदयार्थ्यावर आणि अनेकांच्या संसारावर झाला. याची सूचना पोलिसांनी दिल्यानंतरही कोणतीच कारवाई झाली नाही.पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे महिलांनी एकत्र येवून अवैध दारू विक्रीच्या विरोधात कंबर कसली आहे. – श्री.संजय फुलझेले , ग्रामपंचायत सदस्य,येरगाव
महिलांच्या संसारावर परिणाम झाला – गावातील अवैध दारू विक्रीचा महिलांच्या संसारावर परिणाम झाला. पुरूष मंडळी दारू पिऊन महिलांना मारझोड करण्याचे आणि घराबाहेर हाकलण्याचे प्रमाण वाढले.पोलिसांकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने अवैध दारू विक्री करणा-यांची सुदधा हिंमत वाढली. शिवीगाळीचे प्रमाण वाढले.त्यामुळे महिलांना एकत्र येवून दारूबंदी समिती स्थापन करावी लागली. – प्रभाताई नागापूरे ,उपाध्यक्षा , दारूबंदी समिती ,येरगाव