प्राणप्रतिष्ठा सोहळया निमित्त भव्य कलश शोभायात्रा

224
प्राणप्रतिष्ठा सोहळया निमित्त भव्य कलश शोभायात्रा
स्वामी गोंविद देव गिरीजी महाराज आणि ना.सुधीर मुनगंटीवार,सपना मुनगंटीवार यांची उपस्थिती

मूल :-येथिल श्री माता वासवी कन्यका परमेश्वरी मंदिरातील विविध मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळया निमित्त भव्य कलश शोभायात्रा काढण्यात आली. सोमवारी सकाळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेत स्वतः राज्याचे वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार, सपना मुनगंटीवार आणि अयोध्या येथील श्री राम मंदिर समितीचे कोषाध्यक्ष श्री.स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज उपस्थित होते. कन्यका परमेश्वरी मंदिरा जवळून कलश शोभायात्रेला सुरूवात झाली. मुख्य मार्गावरून फिरून मंदिराजवळ शोभायात्रेची सांगता झाली. शोभायात्रेत डोक्यावर कलश घेतलेल्या  महिला मंडळी, ढोल पथक,लेझिम पथक, बॅन्ड पथक, वेशभूषा  धारण केलेले देवी देवता उपस्थित होते. एका फुलांनी सजविलेल्या रथावर गोविंद देव गिरीजी महाराज विराजमान झाले  होते. शोभायात्रेत सर्वात समोर ना.सुधीर मुनगंटीवर आणि सपना मुनगंटीवार होते.   श्री माता वासवी कन्यका परमेश्वरी मंदिराचे  जीर्णोदधाराचे कार्य नुकतेच  पूर्णत्वास आले. त्यानिमित्त तीन दिवशीय प्राणप्रतिष्ठा सोहळयाचे आयोजन होते. मुख्य सोहळा सोमवारी पार पडला. त्यानिमित्त मंदिरात मंगल मंत्र घोषात आणि शास्त्रोक्त पदधतीने विधीवत पुजन करून श्री गणपती,श्री माता कन्यका ,श्री महादेव,श्री साईबाबा ,श्री गजानन महाराज ,श्री सदगुरू दत्तात्रेय , संकटमोचन श्री हनुमान, व नवग्रह  मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सर्व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या कर कमला द्वारे  करण्यात आले. त्यांनतर गोविंद देव गिरीजी महाराज यांचे उपस्थितांसाठी प्रवचन ठेवण्यात आले होते. महाप्रसादाने प्राणप्रतिष्ठा सोहळयाची सांगता करण्यात आली.तीन दिवसांपासून कन्यका परमेश्वरी मंदिरात विधीवत पुजा अर्चा सुरू होती. या सर्व कार्यक्रमाचे आयोजक सौ.सपना व श्री.सुधीर मुनगंटीवार हे होते. प्राणप्रतिष्ठा सोहळया निमित्त कन्यका परमेश्वरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. यासाठी देवस्थानच्या पदाधिका-यानी अथक परिश्रम घेतले.