बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने तीन पक्षांचे तीन मंच

501
 बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने
तीन पक्षांचे तीन मंच
मूल मध्ये एकच चर्चा

मूल :- येथील गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने गणेश मंडळाचे आणि भाविकांचे स्वागत करण्यासाठी  गांधी चौकात तीन पक्षांची तीन मंच उभारण्यात आली आहे. उभारण्यात आलेल्या या मंचाची मूल मध्ये एकच चर्चा आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असे मंच उभारण्यात आल्याची जनमाणसात आणि राजकीय वर्तूळात चर्चा आहे. मात्र ,मूल नगर पालिकेने मंच उभारण्यासाठी या तीनही पक्षांना कोणतीही परवानगी दिलेली नाही. अवैध रित्या  हे मंच उभारण्यात आल्याचे नगर पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. याबाबत नगर पालिका प्रशासनाने या पक्षांच्या पदाधिका-यांना नोटीस बजावली असल्याचे समजते. मूल मध्ये आज गणपती बाप्पाचे आज विसर्जन करण्यात येणार आहे. त्यासाठी गणेश मंडळातर्फे विसर्जन मिरवणूक निघेल.त्या मिरवणुकीचे स्वागत करण्यासाठी आणि भाविकांचे स्वागत करण्यासाठी येथील गांधी चौकात पक्षांच्या पदाधिका-यांनी पालिका प्रशासनाकडे परवानगी मागितली. मात्र ,नगर पालिका प्रशासनाने वर्दळीचे मुख्य ठिकाण असल्याने आणि गांधी चौकाचा आकारमान बघता तसेच संभाव्य होणारी गर्दी बघता येथे परवानगी नाकारली.त्यांनतरही या तीनही पक्षांनी आपआपले मंच उभारले. गांधी चौकातील मुख्य ठिकाणी असलेल्या या तीनही मंचाची मूल मध्ये एकच चर्चा आहे.निवडणुकीच्या तोंडावर आपआपली राजकीय पोळी भाजण्याचा हा प्रकार असल्याचे बोलल्या जात आहे. विना परवानगीने उभारलेल्या या मंचाच्या पदाधिका-यांवर विसर्जन मिरवणुकी दरम्यान गांधी चौकात  काही अनुचित घटना घडल्यास कारवाई करण्याची शक्यता आहे.


‘‘ विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने गांधी चौकात उभारलेल्या या तीनही पक्षांच्या पदाधिका-यांना मंच उभारण्यासाठी कोणतीही परवानगी दिलेली नाही. अवैध रित्या मंच उभारले गेले आहे.त्यांना नोटिस बजावली आहे.मिरवणुकी दरम्यान येथे काही अनुचित घटना घडल्यास त्यांना जबाबदार धरण्यात येईल, असे जनतेच्या आवाज सोबत बोलताना मूल नगर पालिकेचे मुख्याधिकारी श्री.दोडे यानी सांगितले. ‘‘

विसर्जन मिरवणुक शांततेत पार पडावी यासाठी पोलिस प्रशासनातर्फे तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. मागील वर्षी नगरपालिका प्रशासनातर्फे एकच मंच स्वतः पालिकेने उभारले होते हे विशेष.