ऐतिहासिक मूल नगरीला बाबासाहेबांचा पदस्पर्श

513
बाबासाहेबांनी घेतले होते मूल मध्ये गाईचे ग्लासभर दूध
धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या निमित्ताने भाऊजी गोवर्धन यांच्या आठवणी ताज्या
मूल येथील विश्राम गृहात काही काळ विश्रांती केली होती
भाऊजी गोवर्धन म्हणतात,बाबासाहेब रूबाबदार दिसत होते
ऐतिहासिक मूल नगरीला बाबासाहेबांचा पदस्पर्श

मूल :- विनायक रेकलवार
ऐतिहासिक मूल नगरी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पद स्पर्शाने पावन झाली आहे. नागपूर वरून चंद्रपूर येथे जाण्यासाठी त्यांनी मूल येथील शासकीय विश्राम गृहामध्ये काही काळ विश्रांती केली होती.तो दिवस 15 ऑक्टोबर 1956 चा होता. विश्रांतीच्या काळात बाबासाहेबांनी लिंगाजी कावरूजी गोवर्धन यांच्या घरचे गाईचे ग्लासभर दूध घेतले होते. ही आठवण लिंगाजी गोवर्धन यांचा मुलगा 90 वर्षीय भाऊजी गोवर्धन यांनी सांगितली. चंद्रपूर येथे दरवर्षी साजरा होणा-या  धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या निमित्ताने ही आठवण ताजी झाली.  दरवर्षी 14 ऑक्टोबर हा दिवस धम्मदिक्षा दिन म्हणून नागपूर येथे साजरा केला जातो. 14 ऑक्टोबर 1956 रोजी  लाखो अनुयायांना बाबासाहेबांनी बौदध धम्माची दीक्षा दिली होती. हा ऐतिहासिक अजरामर सोहळा आटोपून 15 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेब भिवापूर,नागभिड मार्गे मूल वरून चंद्रपूर जाणार होते. चंद्रपूर येथे सुदधा लाखो अनुयायांना बौदध धम्माची दीक्षा देण्यात येणार होती. 16 ऑक्टोबर 1956 रोजी हा सोहळा चंद्रपूर येथे पार पडला.त्यामुळे चंद्रपूरला दरवर्षी 16 ऑक्टोबरला धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन साजरा केला जातो.नागपूर नंतर चंद्रपूरची दीक्षाभूमी अख्या जगात प्रसिदध आहे. यासंदर्भातील आठवण ताजी करताना, 90 वर्षीय भाऊजी लिंगाजी गोवर्धन सांगतात, बाबासाहेब अतिशय रूबाबदार दिसत होते.मी त्यांच्या पाया पडलो आणि जयभिम म्हटले.  मूल मध्ये मोटारीने आल्यानंतर त्यांनी येथील विश्राम गृहामध्ये काही काळ विश्रांती घेतली.सोबत त्यांच्या पत्नी होत्या. अनुयायी होते. बाबासाहेब आले… बाबासाहेब आले… म्हणून लिंगाजी गोवर्धन सुदधा विश्रांम गृहात त्यांना भेटायला गेले. सोबत असलेल्या अनुयायांनी  बाबासाहेबांसोबत माझे वडील अर्थात लिंगाजींची  भेट घालून दिली. माझ्या कडे गाई म्हशी आहेत. दुध घेता का ? ऐवढी त्यांनी विचारणा केली. हो म्हटल्यांनतर लिंगाजी यांनी गाईचे ताजे काढलेले ग्लासभर दुध विश्राम गृहात नेऊन दिले. दुध बाबासाहेबांनी  प्राशन केले.  त्यावेळेस मी  अठरा वर्षाचा होतो असे भाऊजी गोवर्धन यांनी आपली आठवण ताजी करताना सांगितले. तसेच पिसाबाई लिंगाजी गोवर्धन यांच्या हातची भाकरी आणि मिरचीच्या  ठेच्याची न्याहारी केल्याची नोंद चंद्रपूरच्या गॅझेट मध्ये आहे.   15 ऑक्टोबर 1956 रोजी मूल मध्ये घडलेल्या  या घडामोडी  भाऊजी गोवर्धन यांना आजही आठवतात.  


बाबासाहेब रूबाबदार दिसत होते :- सायंकाळी चार वाजाताच्या सुमारास मोटारींचा ताफा आला. बाबासाहेब आले असे सांगितले गेले.आमचे घर विश्राम गृहा जवळच होते.त्यामुळे माझे वडील लिंगाजी गोवर्धन भेटायले गेले होते.त्यांच्या सोबत मी सुदधा होतो.त्यावेळेस मी अठरा वर्षाचा असेन असे भाऊजी गोवर्धन यांनी सांगितले.बाबासाहेब अतिशय रूबाबदार दिसत होते. आमचे झोपडीवजा गवताचे घर होते.शेती हा व्यवसाय होता.आणि गाई म्हशी भरपूर होते.त्यामुळे बाबासाहेबांना आमच्या वडिलांनी गाईचे दूध आहे,पिता का असे विचारले होते. ते त्यांनी विश्रात गृहात बसून प्राशन सुदधा केले.काही काळ विश्रांती नंतर बाबासाहेबांचा ताफा 15 ऑक्टोबर रोजीच चंद्रपूर कडे रवाना झाला.कारण 16 ऑक्टोबर 1956 ला चंद्रपूर येथे लाखो अनुयायांना बौदध धम्माची दीक्षा देणार होते. बाबासाहेबांच्या भेटी मुळे आणि त्यांच्या  पदस्पर्शाने आम्ही गोवर्धन परिवार धन्य झालो आहोत असे भाऊजी गोवर्धन आवर्जून सांगतात.

धन्य झाले जीवन :- लांबचा प्रवास करून थकलेल्या बाबासाहेबांनी विश्राम गृहात आराम केला.न्याहारीची व्यवस्था कुठे होईल का ,अशी इच्छा त्यांनी लक्ष्मणराव जुलमे यांच्या कडे व्यक्त केली.तेव्हा जुलमे यांनी विश्राम गृहा शेजारी असलेल्या लिंगाजी गोवर्धन यांच्या घरी येवून पिसाबाई कडे भाकरीची व्यवस्था होईल काय,अशी विचारणा केली.आज एक चांगला योग आला आहे.तुमच्या हातची भाकरी व भाजी बोधी सत्व बाबासाहेब ग्रहण करतील.पिसाबाई आनंदीत झाल्या.त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ज्वारीची भाकरी आणि मिरचीचा ठेचा तयार करून जुलमेंच्या हातात दिला.बाबासाहेबांनी ही भाकरी आनंदाने ग्रहण केली. पिसाबाई गोवर्धन यांनी न्याहारी तयार केल्याची इतिहासात नोंद आहे.
भाऊजी गोवर्धन यांचे लिंगाजी गोवर्धन हे वडील आणि पिसाबाई गोवर्धन या आई होत्या.