बाईक रॅलीने मूलवासियांचे वेधले लक्ष

29
बाईक रॅलीने मूलवासियांचे वेधले लक्ष
मूल :-बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ मूल मध्ये शुक्रवारी दुपारी बाईक रॅली निघाली.ही रॅली लक्षवेधी ठरली.यात महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.मूल मध्ये नगर भ्रमण करीत या रॅलीची सांगता बालविकास प्राथमिक शाळेच्या पंटागणात  करण्यात आली.बाईक रॅलीची सुरूवात इको पार्क गार्डन पासून करण्यात आली होती. फुलांच्या हारांनी सजविलेल्या एका वाहनामध्ये ना.सुधीर मुनगंटीवार स्वतः उपस्थित राहून नागरिकांना अभिवादन करीत होते. यावेळी त्यांना नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग लाभत होता.बॅाईक रॅलीतील सहभागी कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. वाहनामध्ये ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या सोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनूले,माजी नगराध्यक्षा रत्नमाला भोयर,प्रभाकर भोयर,राष्ट्रवादी कॉेंग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर उपस्थित होते. गांधी चौक मार्गे सोमनाथ रोड,नागपूर रोड,ताडाळा रोड,विहिरगाव रोड आणि चंद्रपूर रोड करीत या बाईक रॅलीची सांगता बालविकास प्राथमिक शाळेच्या पटांगणात करण्यात आली. बाईक रॅलीमध्ये महिला व पुरूष  पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. या मातीच्या सेवेसाठी यावे पुन्हा सुधीर भाऊ हे गाणे लक्षवेधी ठरत होते.ना.सुधीर मुनगंटीवार यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.


मूलचा अधिक विकास हेच माझे ध्येय
बालविकास प्राथमिक शाळेच्या पटांगणात बाईक रॅलीला संबोधीत करताना ना.सुधीर मुनगंटीवार यांनी मूल नगरी सह बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचा  अधिक विकास हेच माझे ध्येय असल्याचे सांगितले.