साहित्यमानव ई-बुकचे रविवारी प्रकाशन

80
साहित्यमानव ई-बुकचे रविवारी प्रकाशन
मूल :- साहित्यिक प्रेमींसाठी मेजवाणी  असलेला साहित्यमानव ई बुकचे प्रकाशन रविवारी करण्यात येणार आहे. यात विविध लेखकांचे साहित्य संकलन करण्यात आले आहे. नवलेखक,कवी,कथाकार,मुक्तछंदाकार यांना विशेष स्थान देण्यात आले आहे.विविध साहित्य एकत्रित करून एक अद्वितीय ई बुक तयार करण्यात आले आहे. याचे संपादन आणि संकलन संदेश संतोष शनगनवार यांनी केले आहे. साहित्याच्या प्रवासात ग्रामिण भागातील लेखकांना,कवींना त्यांच्या विचारांना स्थान मिळावे यासाठी या साहित्यमानव ई बुकाची निर्मिती असल्याचे संपादकांनी स्पष्ट केले आहे.आजचे युग डिजीटल युग असल्याने डिजीटल क्रांती हा यातील महत्वाचा भाग आहे.प्रिंट क्षेत्राला अनन्यसाधारण महत्व असले तरी,डिजीटल क्षेत्राला सुदधा तेवढेच महत्व प्राप्त झाले आहे. या क्रांतीकारी बदला मध्ये ई बुकचे महत्व जागतिक पातळीवर फार उच्चतम ठरले आहे.त्यामुळे ई बुकची निर्मिती करण्याची तयारी संपादक मंडळांनी घेतली.लिहते हात या ई बुकामध्ये समाविष्ठ करण्यात आले आहे.लिहत्या हातांना बळ मिळावे,लेखकांच्या ,कवीच्या विचारांना प्रेरणा लाभावी,सामाजिक दृष्टीकोण साहित्यातून प्रगटावा हाच उददेश डोळयांसमोर ठेवून हे ई बुक वाचकांसमोर ठेवल्या जाणार आहे.या ई बुकला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दयावा असे आवाहन साहित्यमानवच्या संपादक मंडळांनी केले आहे.
रविवारी प्रकाशन झाल्यानंतर ई बुक चोखंदळ रसिक वाचकांसाठी खुले करण्यात येणार आहे. सर्वांना याचा आस्वाद घेता येणार आहे.