या मातीच्या सेवेसाठी….

20
या मातीच्या सेवेसाठी….


या मातीच्या सेवेसाठी – यावे सुधीर भाऊ , हे गीत बल्लारपूर विधानसभा मतदार संघात जनसामान्याच्या ओठी बसले आहे.सर्वत्र या गीताचीच चर्चा होताना दिसत आहे.हे गीत म्हणजे,भाऊंच्या दुरदृष्टीकोनाची पावती आहे.बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचा विकास हेच सुधीर भाऊंचे मुख्य ध्येय आहे.याआधी बारामतीच्या विकासाची चर्चा व्हायची.आम्हाला बारामतीसारखा विकास करायचा आहे,असे सर्वार्थाने बोलले जायचे.मात्र,आज चांदया पासून बांदयापर्यंत बल्लारपूर विधानसभा मतदार संघात झालेल्या , मुख्यत्वे चंद्रपूर जिल्हयात झालेल्या विकासाची चर्चा होताना दिसत आहे.विकासाची चर्चा सर्वत्र होत असल्याने आजच्या घडीला ना.सुधीर मुनगंटीवार आमचे स्टार झाले आहेत. या स्टार माणसाला,आमच्या विकासाचा महामेरू असलेल्या तसेच जनसामान्याचा आवाज बुलंद करणा-या या माणसाला आम्ही तसूभरही धक्का लागू देणार नाही,अशी मतदार संघात विकासात्मक प्रती भावना आहे.ना.सुधीर मुनगंटीवार यांनी काय केले नाही. मूल नगरीचा चेहरा मोहरा बदलवला,बल्लारपूरात विकासाची गंगा आणली.पोंभूर्ण्याला नवी ओळख दिली. मतदार संघातील ग्रामीण भागातील रस्ते चकाचक केले. खेडे गाव ऐकमेंकाना जोडले. शेतक-यांसाठी सिंचनाची सोय उपलब्ध करून दिली.नदीवर बंधारे बांधले. आसोला मेंढा तलावाचे पाणी शेतक-यांच्या शेतीपर्यंत पोहचवले.कृषी महाविदयालय आणले.या महाविदयालयाचा फायदा धान उत्पादक शेतकरी,भाजीपाला उत्पादक शेतकरी,फळ उत्पादक शेतकरी यांना होत आहे.मत्स्यपालनासाठी,मत्स्यवाढीसाठी तलावाची दुरूस्ती केली.यांना विविध योजनाचा लाभ दिला.सिंचनवाढीसाठी मामा तलावाचे खोलीकरण  केले.मूल येथील मामा तलाव हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. उन्हाळयात सुदधा तलावात भरपूर  पाणी राहत असल्याने शेतक-यांना त्यांच्या उन्हाळी पीकासाठी फायदा झाला. बसस्थानकांचे स्वरूप बदलविले. नवीन बसेस जिल्याला देवून प्रवाश्यांचा प्रवास सुखकर आणि सुरूक्षित केला.खेडेगाव आणि शहराचे सौदर्यीकरण केले.शहरे उठावदार झाली.नगराचे स्वरूप बदलले.त्यामुळे पुणे – मुंबईच्या लोकांचा चंद्रपूर जिल्हयाकडे , बल्लारपूर विधानसभा मतदार संघाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. अधिकारी वर्ग या मतदार संघात ,जिल्हयात रूजला. त्यांचे मन रमायला लागले. अधिकारी वर्ग मोठया मनाने ,आपूलकीने,प्रेमाने आणि जनसामान्यासाठी काम करायला लागले.त्यांच्यातील कल्पना,विचार या भागात रूजायला लागले.ख-या अर्थाने सुधीर मुनगंटीवार यांच्या सारख्या दूरदृष्टीकोन असलेल्या लोकप्रतिनिधींना मनातील लोकात्मक विकास करताना मोठी मदत मिळाली. मूल येथील आठवडी बाजाराचे चित्र बदलविले. ग्रामिण भागातील,चंद्रपूर जिल्हयाचा खेळाडू ऑलिम्पिक मध्ये खेळला पाहिजे हे सुधीर भाऊंचे स्वप्न आहे.शालेय विदयार्थ्यांना ताडोबाची सफर घडविल्या जात आहे. वरिष्ठ पातळीवरच्या कॉन्फरंस वनअकादमी मध्ये घेतल्या जात आहे.विसापूर मध्ये झालेली बॉटनिकल गार्डनची निर्मिती हे भाऊंच्या विकासात्मक कार्याची पावती आहे.केवळ विकास नाही,तर त्यातून रोजगार निर्मिती हे त्यांचे उद्यिष्टय आहे.ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे सुधीर भाऊंचे समिकरण आहे. .तळागाळातल्या लोकांचा विकास हे भाऊंची कार्यशैली आहे. महाराष्ट्रात नव्हे,ऐवढे भव्य एसी विश्राम गृह मध्ये बांधण्यात आले. ना.सुधीर भाऊंना विकास हवा आहे.तो विकास आपल्याला सांगायचा आहे.त्यासाठी ते प्रकल्प प्रत्यक्षात साकारण्याची जबाबदारी भाऊ आपल्याकडे घेतात.त्यातून त्यांच्या कामाची,कार्यशैलीची चुणूक नसानसातून दिसते. बल्लारपूर विधानसभा मतदार संघात सर्वांगाने झालेला विकास हा ना.सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी फलश्रुती ठरावी. या मातीच्या सेवेसाठी अजून बरेच साध्य करायचे आहे.ते साध्य करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार पुन्हा हवे आहेत. कारण ती विकासात्मक,लोकात्मक दूरदृष्टी त्यांच्या ऐवढी कोणातच नाही, हे तीळमात्र सत्य आहे.