महायुती सरकार लाडकी बहीण योजनेचा गवगवा करून बहीणींचा अपमान करीत आहेत
तेली समाज स्नेह मिलन कार्यक्रमात आ. अँड. अभिजीत वंजारी यांचा आरोप
मूल : भेट स्वरूपात दिलेल्या रक्कमेचा कोणीही गवगवा करीत नाही, परंतू महायुती सरकार स्वार्थासाठी लाडकी बहिण योजनेत दिलेल्या १५०० रूपयाचा गवगवा करून बहिणींचा अपमान करीत असून रवि राणा, धनंजय महाडीक आणि टेकचंद सावरकर सारखे लोकप्रतिनिधी बहिणींना पाहुन घेण्याचे वक्तव्य करीत आहेत. ही बाब अशोभनिय असून होवू घातलेल्या निवडणुकीत लाडक्या बहिणी महायुतीचा वचपा काढावा. असे आवाहन आमदार अँड. अभिजीत वंजारी यांनी केले. भाजपा हा खोटारडा पक्ष असून जाती-पातीचे राजकारण करीत आहे. यापूर्वी राज्याच्या राजकारणात कधीही असे घडले नाही असे कृत्य करून राज्याच्या राजकिय संस्कृतीला आणि संत महात्म्याच्या भूमीला काळीमा फासण्याचे दुष्कृत्य करीत असल्याचा आरोप करतांना आ. अँड. अभिजीत वंजारी यांनी राजकिय क्षेत्रात काम करतांना कोणालाही एका समाजाच्या बळावर उमेदवारी मिळत नाही तर सामाजीक व राजकिय क्षेत्रात काम करणा-या मंडळींनी संघर्ष, आंदोलन, जनतेच्या तक्रारीचे निवारण करत सतत जनसंपर्कात राहावे लागते. तेव्हाच राजकिय पक्ष उमेदवारी देतांना नोंद घेते. इतिहासात नोंद असलेल्या काॅंग्रेस पक्षाने काही वर्षापूर्वी 26 आमदार देत तेली समाजाला न्याय देण्याची भूमीका स्विकारली आहे. यापूर्वीही महादेवराव ताजणे आणि देवराव भांडेकर यांनी प्रतिनिधीत्व केले असून स्व. शांताराम पोटदुखे यांचा खासदारकीचा प्रदिर्घ कार्यकाळ जनतेला ज्ञात आहे. सध्याची राजकिय परिस्थिती बदलली असून पक्ष फोड आणि पन्नास खोकेच्या कार्यप्रणालीत अन्याय झाल्याचे वक्तव्य करणा-या तेली समाज बांधवांनी काॅंग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे. असे आवाहनही अँड. अभिजीत वंजारी यांनी केले.
स्थानिक रामलिला सभागृह येथे पार पडलेल्या तेली समाज स्नेहमिलन सोहळयात बोलत होते. विदर्भ तेली समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बबनराव फंड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात सामाजीक कार्यकर्ते डाॅ. रामचंद्र दांडेकर, रामभाऊ बुरांडे, अँड. प्रणय वैरागडे, माजी नगराध्यक्ष वनिता बुटले, बाजार समितीचे माजी सभापती घनश्याम येनुरकर, संचालक चंदा कामडे, देवाडाचे सरपंच विलास मोगरकर, कोसंबीचे सरपंच रविंद्र कामडे, नागाळा येथील समाजाचे अध्यक्ष देवराव धोडरे, कोठारी येथील संतोष इटनकर, विसापूर येथील तुळशिदास पिपंळे, आदर्श सहकारी संस्थेचे अध्यक्ष पुरूषोत्तम भुरसे, माजी सरपंच महादेव सोमनकर आदि उपस्थित होते.
समाजाचे आरादय दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमा पुजन आणि दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. निवृत्त प्राचार्य गंगाधर कुनघाडकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बबनराव फंड यांनी तेली समाज सदैव काॅंग्रेसच्या पाठीशी राहीला आहे, ती परंपरा खंडीत न करता होवू घातलेल्या निवडणुकीत तेली समाजाने काॅंग्रेस पक्षाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे. अशी विनंती केली. सरपंच विलास मोगरकर यांनी काॅंग्रेसचे उमेदवार संतोषसिंह रावत यांनी तेली समाजाच्या कार्यकर्त्याना सदैव मदत केली असून यापुढेही करत राहतील. असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचलन श्रीकृष्ण धोडरे यांनी तर विदर्भ तेली महासंघाचे महासचिव कैलास चलाख यांनी आभार मानले. कार्यक्रमाला तेली समाजातील बंधु भगिनी आणि युवक मोठया संख्येनी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेतन कामडे, प्रशांत भरतकर, अल्का कामडे, अनिल वासेकर, सुधीर कावळे, विनोद आबंटकर यांनी परिश्रम घेतले.