प्रचाराच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांसाठी ना. सुधीर मुनगंटीवार सरसावले

20

*प्रचाराच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांसाठी ना. सुधीर मुनगंटीवार सरसावले*

*नुकसानग्रस्त धान उत्पादकांना आर्थिक मदत करा*

*प्रधान सचिवांसह निवडणूक आयोगाला दिले पत्र*

*बल्लारपूर – राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर सभा, रॅली, प्रत्यक्ष भेटींमध्ये व्यस्त असताना शेतकऱ्यांप्रती त्यांची संवेदनशीलता त्यांनी जपली आहे, याची प्रचिती धान उत्पादक शेकऱ्यांसाठी लिहिलेल्या पत्रावरून आली आहे.*

ना. मुनगंटीवार यांनी कृषी विभागाच्या प्रधान सचिवांना आणि जिल्हा निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र लिहून धान उत्पादकांच्या समस्येचे गांभीर्य लक्षात आणून दिले आहे. धान पिकावरील मावा व घाटे अळी रोगामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व भविष्यात होवू शकणारे नुकसान या बाबत तात्काळ उपाययोजना करण्याबाबत व आर्थिक सहाय्य करण्याच्या सूचना त्यांनी या पत्रात दिल्या आहेत.

‘चंद्रपूर जिल्ह्यात हजारो शेतकरी धानाची शेती करतात. धान हेच त्यांचे मुख्य पीक असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील, विशेषतः मुल, पोंभुर्णा, बल्लारपूर तालुक्यातील धान पिकावर मावा या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यात घाटे अळीचे प्रमाण देखील जास्त दिसून येत आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यासंदर्भात तात्काळ उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. या धान उत्पादकांना आर्थिक मदत मिळण्यासाठी आपण तातडीने संबंधिताना आदेश द्यावेत,’ अशी मागणी ना. श्री. मुनगंटीवार यांनी पत्राद्वारे केली आहे. या पत्राची प्रत चंद्रपूरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी तसेच चंद्रपूर जिल्हा कृषी अधिक्षकांना देखील पाठविण्यात आली आहे.

*शेतकऱ्यांसाठी सदैव तत्पर*
ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची विक्रमी 202 कोटीची रक्कम मिळू शकली. शेतकऱ्याच्या धानाला 20 हजार रुपये हेक्टरी बोनस देऊन भात उत्पादक शेतकऱ्याला न्याय देण्याचे काम त्यांनी केले. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात 1500 रूपये देण्यात येत आहेत. जिल्ह्यातील 4 लक्ष 72 हजार लाडक्या बहिणीला लाभ मिळावा यासाठी त्यांनी विशेष श्रम घेतले.