46

बोरचांदली येथील अवैध दारू विक्रेत्यांचा बंदोबस्त करा
महिलांची पोलिस ठाण्यात धडक,निवेदन सादर
मूल :- तालुक्यातील बोरचांदली येथील महिला गावातील अवैध दारूविक्रीने त्रस्त झाल्या आहेत.त्यांनी याविरूदध एल्गार उभारला आहे.अवैध दारूविक्री करणा-या बारा जणांची निवेदनासह यादी त्यांनी गुरूवारी मूल पोलिस ठाणे आणि तहसिलदार यांच्या कडे सुपूर्द केली. चंद्रपूर जिल्यात आडवी बाटली उभी झाली.ठिकठिकाणी दारूचे दुकान आणि बियर बार सुरू झाले. गावातील मद्यपींचा त्रास वाचविण्यासाठी काहींनी गावातच रस्तालगत हॉटेल टाकून त्यामाध्यमातून अवैध दारू विक्रीचा धंदा सुरू केला.त्यामुळे मद्यपींची संख्या वाढली.अवैध दारू मुळे गावात भांडणे ,कुटुंबात पती पत्नीमध्ये वाद,मारहाण,शिवीगाळ या मध्ये वाढ झाली. वाईट सवयी मुळे शालेय विदयार्थ्यी,युवावर्ग आणि लहान मुलांच्या मनावर वाईट परिणाम जाणवू लागले.युवावर्ग सुदधा दारूच्या आहारी जात असल्याने बोरचांदली आणि राजगड परिसरात चोरीच्या घटनात वाढ झाली. सामाजिक सलोखा नष्ट होत असल्याने गावातील महिला त्रस्त झाल्या आहेत.गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात सापडली आहे. याविरूदध महिलांनी पोलिस ठाण्यात धडक दिली. बोरचांदली येथील शंभरच्या वर महिलांच्या सहीचे असलेले निवेदन गुरूवारी मूल पोलिस ठाणाच्या माध्यमातून पोलिस अधिक्षक आणि तहसिलदार यांना निवेदन सादर केले.अवैध दारू विकं्रेत्यांचा बंदोबस्त करून त्यांच्याविरूदध कारवाईची मागणी केली आहे.अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे. पोलिस अधिक्षक काय कारवाई करतात याकडे महिलांचे लक्ष लागले आहे.

बारा जणाच्या यादीत एका माजी नगरसेवकाचे नाव ? :-बोरचांदली येथील महिलांनी पोलिस अधिक्षकांकडे दिलेल्या निवेदनातून अवैध दारू विक्री करणा-या बारा जणांची यादी सादर केली.त्या यादीत मूल येथील एका माजी नगरसेवकाचे नाव असल्याचे समजते. हा  कार्यकर्ता एका राष्ट्रीय पक्षाचा असल्याचे बोलल्या जाते. पोलिस प्रशासनाचा तालुक्यावरचा वचक संपल्याने अवैध धंदयात सुद्धा मोठया प्रमाणात वाढ झाली आहे.