मंत्री झाल्यास मंदिराचा परिसर अधिक देखणा करू – विरोधी पक्षनेता आ. विजय वडेट्टीवार

56

मंत्री झाल्यास मंदिराचा परिसर अधिक देखणा करू

– विरोधी पक्षनेता आमदार विजय वडेट्टीवार

मूल :- माँ.दुर्गा मंदिर सभागृह उभारण्यासाठी दुर्गा मातेनेच मला संधी दिली.मातेच्या आशीर्वादाने पुन्हा मंत्री होण्याची संधी मिळाली तर मातेचा परिसर अतिशय देखणा करु, असे मत राज्याचे
विरोधी पक्ष नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. मुल येथे जिल्हा खनिज विकास निधी व खासदार स्थानिक विकास निधी मधून बांधकाम करण्यात आलेल्या माॕ दुर्गा मंदिर परिसरातील  सामाजिक सभागृहाचे लोकार्पण करतांना ते बोलत होते.लोकार्पण सोहळ्याचे अध्यक्ष मंदिर समितीचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत हे होते.प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोलीचे  माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी, काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, डाँ. नामदेव किरसान, ज्येष्ठ कार्यकर्ते हसन जिलानी, प्राचार्य देविदास जगनाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, सिदेंवाहीचे नगराध्यक्ष स्वप्नील कावळे, माजी सभापती व संचालक घनश्याम येनुरकर, माजी नगरसेवक नंदुजी नागरकर, माजी नगराध्यक्ष विजय चिमड्यालवार, सा.बां.उपविभागाचे उपविभागीय अभियंता प्रशांत वसुले, माजी महापौर वसंता देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर मंदिरात सामाजिक सभागृह उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावे. अशी विनंती ना. विजय वडेट्टीवार यांना केली असता तात्काळ निधी उपलब्ध करुन दिल्यानेच हे सभागृह साकारल्याचे मत मंदिर समितीचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती राकेश रत्नावार यांनी  केले. मंदिर बांधत असताना अनेक अडचणी आल्या. परंतु मातेच्या आशीर्वादाने व विजयभाऊच्या सहकार्याने अडचणी दूर झाल्याचे त्यांनी प्रास्ताविकातून सांगितले. कार्यक्रमाचे संचालन मंदिर समितीचे सचिव संजय पडोळे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन मंदिर समितीचे सदस्य गुरु गुरनुले यांनी मानले. कार्यक्रमानंतर ना. विजय वडेट्टीवार यांचे हस्ते मुल तालुका कांग्रेस, महिला काँग्रेसच्या वतीने नियुक्त केलेल्या सर्व सेलच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, सहसचिव यांना नियुक्ती पत्र देवुन सन्मानित करण्यात आले.