आमदार प्रतिभा बाळूभाऊ धानोरकर यांनाच काँग्रेसची लोकसभेची उमेदवारी द्या –  कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठराव 

42

आमदार प्रतिभा बाळूभाऊ धानोरकर यांनाच काँग्रेसची लोकसभेची उमेदवारी द्या –  कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठराव

मूल :-  तालुक्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांची बैठक कॉंग्रेस जनसंपर्क कार्यालय मारकवार कॉम्प्लेक्स ( चामोर्शि फाटा, नाक्याच्या मागे) मूल येथे गुरूवारी पार पडली. यावेळी आमदार प्रतिभा बाळूभाऊ धानोरकर यांनाच काँग्रेसची लोकसभेची उमेदवारी द्यावी असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला
या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून अनिल धानोरकर (माजी नगराध्यक्ष भद्रावती), प्रकाश पाटील ( माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर) , प्रशांत भारती, गोपाल अमृतकर, वसंत सिंह, विनोद अहिरकर ( माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर) , रामकृष्ण कोंड्रा हे उपस्थित होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार देवराव भांडेकर हे होते.
सभेच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अनिल धानोरकर यांच्या हस्ते मालार्पण करण्यात आले.
या प्रसंगी सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
यावेळी आमदार प्रतिभा बाळूभाऊ धानोरकर यांनाच काँग्रेसची लोकसभेची उमेदवारी द्यावी असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला व त्याची प्रत खासदार मल्लिकार्जून खरगे अध्यक्ष अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, खासदार श्री राहुल गांधी व प्रांताध्यक्ष आमदार नाना पटोले यांना पाठविण्याचे ठरले.
प्रकाश पाटील यांनी बोलतांना सांगितले की निवडणूक म्हणजे युद्घासारखी असते . येणारी लोकसभा निवडणूक युद्ध स्तरावर पूर्ण परिश्रमाने लढण्याची तयारी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी करावी.असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीला शरीफ भाई, प्रमोद चिंतावार, बाळू गटलेवार , प्रभाकर बोमावार, संदीप चिंचोलकर, वैशाली पुल्लाबार, राहुल तोटावार, अरविंद कडस्कर, विक्रम गुरुनुले, अशोक पुल्लावार, दिपक कोटगले, नरेंद्र चौधरी, शरद गणवीर , महेश कटकमवार, राकेश येनुगवार, संजय कुंटावार, भुजंग चलाख , दिलीप कामडे, भिवणकर,पराग वाढई इत्यादी तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.