पहिली महिला खासदार?

136

पहिली महिला खासदार?

गोपीकाताई मारोतराव कन्नमवार या चंद्रपूर लोकसभानिर्वाचन क्षेत्राच्या पहिल्या महिला खासदार

18 व्या लोकसभेची धामधुम सुरू झाली आहे.  देश पातळीवरएनडीए विरूध्द इंडिया आघाडी तर चंद्रपूर लोकसभा निर्वाचनक्षेत्रातून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार विरूध्द आमदार प्रतिभाधानोरकर यांचेत थेट लढत होत आहे.  आमदार प्रतिभाधानोरकर या महिला असल्यांने, या क्षेत्रातून महिला खासदारहोतील काय? हा प्रश्न वारंवार विचारल्या जात आहे.  यापूर्वीहीचंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रातून महिला खासदार म्हणूननिवडून आली होती. 1964 च्या पोटनिवडणूकीत ही महिलाखासदार चंद्रपूर जिल्हयाचे प्रतिनिधीत्व करीत होती.

कोण होती पहिली महिला खासदार?

गोपीकाताई मारोतराव कन्नमवार या चंद्रपूर लोकसभानिर्वाचन क्षेत्राच्या पहिल्या महिला खासदार होत्या. स्वतंत्रभारताच्या पहिल्या लोकसभा निवडणूकीत ताहेर अली वत्यांच्या पाठोपाठ व्ही. एन. स्वामी हे खासदार म्हणून निवडूणआले होते.

१९६२ च्या लोकसभा निवडणुकीत लालश्यामशाहा लाल भगवानशाहा हे अपक्ष म्हणून निवडूनआले होते. त्यावेळी निर्वासितांच्या पुनर्वसनाचे प्रश्न वआदिवासींचे मूळ प्रश्न डावलून बांग्लादेशाच्यानिर्वासितांना आश्रय देण्याला प्राधान्य दिले जात होते. हीबाब त्यांनी खटकली. त्यांनी याकडे तत्कालिन पंतप्रधानपंडित जवाहरलाल नेहरू यांचे लक्ष वेधले. यानंतर त्यांनी५ सप्टेंबर १९६२ रोजी खासदारकीची शपथ घेतली. मात्रत्यांना सरकारच्या धोरणाविरुद्ध दुसऱ्यादिवशी आपल्याखासदारकीचा राजीनामा दिला. तो २४ एप्रिल १९६४ लाराजीनामा मंजूर झाला.  या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्याजागेसाठी  १९६४  मध्ये पोटनिवडणूक झाली.    भारतीयराष्ट्रिय कॉंग्रेसने माजी मुख्यमंत्री स्व. दादासाहेब कन्नमवारयांची पत्नी गोपिकाताई कन्नमवार यांना उमेदवारी दिली. त्यांनी स्वतंत्र पार्टीचे के. एम. कौशीक यांचे विरोधातनिवडणूक लढवून विजय मिळविला व पुढे अडीच वर्षत्या चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या खासदार होत्या.  या निवडणुकीत गोपिकाताई कन्नमवार या विजयीझाल्या. त्या या मतदारसंघाच्या पहिल्या महिला खासदारठरल्या. यानंतर १९६७ मध्ये झालेल्या लोकसभानिवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला.

यानंतर, खासदारकीच्या निवडणूकीत प्रमुख पक्षांनी महिलांनासंधी दिली नाही.  मात्र कॉंग्रेसनेच तब्बल 58 वर्षानंतर प्रतिभाधानोरकर या महिलेला उमेदवारी दिल्याने चंद्रपूर जिल्हयाचीपहिली महिला खासदार गोपिकाताई कन्नमवार यांची आठवणताजी झाली आहे.

कशी झाली लढत?

तिसर्या लोकसभा निवडणूकीच्या चंद्रपूर लोकसभानिर्वाचन क्षेत्रातील पोटनिवडणूक रंजक झाली. यानिवडणूकीत 4 उमेदवार रिंगणात होते.  भारतीय राष्ट्रियकॉंग्रेसच्या गोपिकाताई मारोतराव कन्नमवार यांना1,05,163 (52.36%), के. एम. कौशिक 79,529 (39.6%), एन. एस. उईके 8264 (4.11%), यु.डी. कुळमेथे 7,877 (3.92%)  अशी मते मिळाली. अर्ध्यापेक्षाअधिक मते मिळवित गोपिकाताई चंद्रपूर लोकसभेच्यापहिल्या महिला खासदार झाल्यात.

अशा होत्या गोपिकाताई कन्नमवार!

वयाच्या केवळ अठराव्या वर्षी मारोतराव ज्यांना सारेचजण दादाम्हणत त्यांचा गोपिकाबाई यांच्याशी हिंगणघाट या ठिकाणीविवाह झाला. बऱ्यापैकी सधन कुटुंबातल्या गोपिकाबाईमारोतरावांच्या चंद्रमौळी संसारात हळूहळू रमल्या. नवऱ्याच्याघरी अठराविश्व दारिद्र्य असताना गोपिकाबाईंनी मोठ्याजबाबदारीनं संसार चालवला. त्याकरता प्रसंगी त्यांनी २५ रुपयेमहिना पगाराची नोकरी सुद्धा केली.

आपल्या नवऱ्याच्या राजकीय कार्यात सुद्धा गोपिकाबाईंची साथहोती. १९५९ साली काँग्रेसचं ६४ वं अधिवेशन नागपूरमध्येभरलं होत. मारोतरावांच्या पत्नी गोपिकाबाई कन्नमवार यांची याअधिवेशनाच्या स्वागताध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली. तेव्हा नागपूर प्रदेश काँग्रेस कमेटीच्या अध्यक्ष होत्या. गोपिकाबाईंना सगळे ताईसाहेब कन्नमवार म्हणत.

या अधिवेशनाचे यजमानपद त्यामुळे स्वाभाविकपणेचकन्नमवार यांच्याकडे होत. पंतप्रधान पंडित जवाहरलालनेहरूंच्या उपस्थितीत ढेबर भाईंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या याअधिवेशनाची भव्यता पाहून देशाच्या वेगवेगळ्या भागांतूनआलेल्या काँग्रेस नेत्यांनी कन्नमवारांची मुक्तकंठाने प्रशंसा केलीहोती. काँग्रेस नेतेच काय तर खुद्द पंडित नेहरूंनी सुद्धागोपिकाबाईंबद्दल गौरवोद्गार काढले होते.

२४ ऑक्टोबर १९६४ या दिवशी कन्नमवारांचा मृत्यू झाला. एकमहिन्याच्या अंतराने त्यांच्या जीवनावर साहित्यभूषण तु. ना. काटकर यांनी लिहिलेल्या एका छोटेखानी पुस्तकाचे प्रकाशनहोते. नागपूरच्या चिटणीस पार्कवर तेव्हाचे संरक्षणमंत्रीयशवंतराव चव्हाण या सोहळ्यासाठी आले होते.

त्या भव्य समारंभाला हजर राहून दुसऱ्या दिवशी चंद्रपूरलाजाणारी बस पकडायला शांताराम पोटदुखे आणि पत्रकार सुरेशद्वादशीवार नागपूरच्या जुन्या एस.टी. स्टँडवर गेले होते. तेव्हादादासाहेबांच्या पत्नी गोपिकाबाई त्या स्टँडवरच त्यांना दिसल्या. हातात एक छोटीशी बॅग घेतलेल्या गोपिकाबाई एस.टी.च्यातिकिटासाठी सामान्य माणसांप्रमाणे रांगेत उभ्या होत्या.

एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्रीणबाई असलेल्या गोपिकाबाईंना तसंबेदखल उभं असलेल पाहून त्या दोघांना हि गलबलून आलं. मगत्यांच्यातल्याच एकाने त्यांना जबरीनेच बसायला लावून त्यांचीतिकिटे काढून आणली.

अशी हि व्रतस्थ स्त्री शेवटपर्यंत आपल्या पतीप्रमाणे स्वच्छप्रतिमा घेऊनच जगली. आज असं एखाद्या मुख्यमंत्र्यांच्याबायकोला जगता येणं केवळ आणि केवळ अशक्य.