बिबटयाला पकडण्यात वनविभागाला अपयश, शोधमोहिम राबविण्याची मागणी, बिबट्याची पिंजऱ्याला हुलकावणी

146
बिबटयाला पकडण्यात वनविभागाला अपयश
शोधमोहिम राबविण्याची मागणी
बिबट्याची पिंजऱ्याला हुलकावणी
मूल :- चार दिवसानंतरही राजगड येथिल बिबटयाला पकडण्यात सावली वनविभगाला अपयश आले आहे. मनुष्यबळ कमी असल्याचे कारण देत वनविभाग दुर्लक्ष करीत आहे.पिंज-याला बिबटया हुलकावणी देत आहे.वनविभागाने शोधमोहिम राबवून बिबटयाला तात्काळ जेरबंद करावे अशी मागणी येथील उपसरपंच चंदू पाटिल मारकवार यांनी केली आहे.बिबटयाचा धुमाकूळ सुरूच असल्याने राजगड दहशतीत सापडले आहे. जवळपास तीन शेळयांना ठार केल्याने येथील शेतकरी वर्ग आणि गावक-यांत भितीचे वातावरण पसरले आहे.एकदुकटे गावकरी बाहेर फिरण्यास घाबरत आहेत. तालुक्यातील राजगड येथे बिबटयाच्या उपद्रवामुळे गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे.दोन दिवसात दोन घटना घडल्याने सावली वनविभागाविषयी नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे. पिंजरे लावले असले तरी वनविभागास अपयश येत आहे. बुधवारी रात्री बिबटयाने दिलीप मगरे यांच्या बक-याचा फडसा पाडला होता.परत दोन दिवसानंतर शुक्रवारी रात्री राजगड येथील मधुकर नन्नावरे यांच्या दोन शेळयांना ठार केले. तलावाजवळील हेमांडपंथी मंदिराजवळ नन्नावरे यांचे घर आहे.अंगणात शेळया बांधलेल्या होत्या.बिबटयाने रात्रीच्या सुनसानचा फायदा  घेवून चोर पावलाने दोन शेळयांना ठार केले. बिबटयाने हल्ला केल्याने बाकीच्या शेळया ओरडल्या.त्यामुळे मधुकर नन्नावरे आणि त्यांचे कुटुंबिय जागे झाले.तो पर्यंत बिबटयाने दोन्ही शेळयांना ठार करून पसार झालेला होता.दोन दिवसात दोन घटना घडल्याने राजगडवासियांमध्ये सावली वनविभागाविषयी तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.बिबटयाचा बंदोबस्त करा अशी मागणी येथे जोर धरीत आहे. रात्रीच्या वेळेस चोर पावलाने बिबटया गावात शिरून शेळयांना ठार करीत असल्याने शेतकरी आणि  नागरिकांमध्ये मोठे भितीचे वातावरण पसरले आहे. बिबटया गावात धुमाकूळ घालत असल्याने रब्बी हंगामातील पिकांवर सुदधा त्याचा मोठा परिणाम होत आहे. वाघा पाठोपाठ बिबटयाने धुमाकूळ घालण्यास सुरूवात केल्याने राजगडचे नागरिक मोठे त्रस्त झाले आहेत.सावलीच्या वनविभागास वाघाला पकडण्यात सुदधा अपयश आले होते.आता,बिबटयाला पकडण्यास त्यांना अपयश येत आहे.वनविभागाने ठिकठिकाणी पिंजरे लावले आहेत.मात्र,  बिबटया पिंज-याला हुलकावणी देत असल्याचे बोलल्या जाते.गावातील नागरिक आपल्या लोकांच्या सुरक्षेसाठी आता घोळक्याने सुरक्षा देत आहेत. बिबटया राजगडच्याच परिसरात फिरत असावा असा अंदाज आहे. लहान मुलांविषयी गावक-यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.बिबटया हा नागरिकांच्या गोठयापर्यंत येवू लागल्याने मोठी भितीयुक्त चिंता गावक-यांमध्ये आहे. पिंजरे लावूनही उपयोग होत नसल्याने वनविभागाने मोठया प्रमाणात
शोध मोहिम राबवून बिबटयाला तात्काळ जेरबंद करावे आणि गावाला दहशत मुक्त करावे अशी मागणी चंदू मारकवार यांनी केली आहे.