देशाला मजबूत नेतृत्व मोदीच देऊ शकतात – ना.छगन भूजबळ

32

देशाला मजबूत नेतृत्व मोदीच देऊ शकतात – ना.छगन भूजबळ
मूल :- लोककल्याणकारी योजना राबवून देशाला सक्षम बनविले जात आहे. देशाला अधिक मजबूत करायचे असेल,तर मोंदीजींशिवाय पर्याय नाही. त्यांचे पुन्हा एकदा नेतृत्व लाभण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांच्या सारखा दूरदृष्टीकोण असणारा विकास पुरूष लोकसभेत पाठविणे गरजेचे आहे.मोदीच देशाला मजबूत नेतृत्व देऊ शकतात,असे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.छगन भूजबळ यांनी व्यक्त केले. चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ ते मूल मध्ये बोलत होते.येथील मा.सा.कन्नमवार सभागृहात मंगळवारी कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ना.छगन भूजबळ हे होते.मेळाव्याचे उदघाटन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे होते. भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ, डॉ.भूषण कुमार कर्डीले,संध्याताई गुरनूले,अल्का आत्राम,रत्नमाला भोयर,प्रभाकर भोयर,नितिन भटारकर,मंगेश पोटवार,आशिष देवतळे,चंद्रकांत आष्टनकर,विनोद बुटले, विशाल नागूलवार आदिंची प्रमूख उपस्थिती होती. राज्यातील सरकार ओबीसींच्या पाठिशी आहे.ओबीसींवर अन्याय होता कामा नये,अशी आमची भूमिका आहे. ओबीसीची लढाई सुरू झाल्यानंतर एकही विरोधक याबाबतीत बोलला नाही. मोदीजी हे ओबीसी प्रवर्गाचे आहेत.सबका साथ सबका विकास हे आमचे ध्येय आहे.मात्र, विरोधक समाजा समाजामध्ये भेद निर्माण करीत दूरी तयार करीत आहेत,अशी टिका भूजबळ यांनी यावेळी केली.आम्ही मराठयांच्या विरोधात नाही.मराठा हा राज्यकर्ता समाज आहे.परंतु ,ओबीसींवर अन्याय होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही,असा कडक इशारा त्यांनी दिला.यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्र शासनाच्या विकास कामांची यादी जनतेसमोर मांडली.विकसीत भारताच्या संकल्पनांना सर्वांनी साथ दिली पाहिजे.निवडणुकीचा जाहिरनामा मोदींजींनी देशाला दिला.त्यांची संकल्पना घरोघरी पोहचली पाहिजे.भारत हा जगातील तिसरी आर्थिक महासत्ता देश म्हणून पुढे जाईल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. यावेळी चित्राताई वाघ,आशिष देवतळे,रत्नमाला भोयर यांनीही आपले मनोगत सादर केले.मेळाव्याचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष संध्याताई गुरनूले यांनी केले.संचालन महेंद्र करकाडे यांनी ,तर आभार अनिल साखरकर यांनी मानले.मेळाव्याला भाजपाचे पदाधिकारी ,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.