खडडयांमध्ये लावले बेशरमाचे झाड , युवक कॉंग्रेसने केला निषेध

75
खडडयांमध्ये लावले बेशरमाचे झाड
युवक कॉंग्रेसने केला निषेध
खेडी ते गोंडपिपरी रस्त्याचे बांधकाम निकृष्ट
संबंधित कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी
मूल
 :—  खेडी ते गोंडपिपरी राष्ट्रीय महामार्गावर  मागील पाच वर्षापासून रस्त्याचे  बांधकाम कासवगतीने सुरू आहे. शासनाच्या तिजोरीतून करोडो रुपये खर्च झाले.तरीही रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले.रस्त्यावर  मोठं मोठे खड्डे पडत आहेत.त्याचा निषेध म्हणून येथिल युवक कॉंग्रेस तर्फे खडडयांमध्ये बेशरमाचे झाड लावून निषेध करण्यात आला.संबधित कंत्राटदारास काळया यादीत टाकण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सबंधित बांधकाम विभागाच्या अधिका—यावंर कारवाई करण्यात यावी अशी मागणी युवक कॉंग्रेसने केली आहे.   चुकीच्या नियोजनामुळे या मार्गावर कित्येकांचे जीव गेलेले आहे. अनेकांना गंभीर अपघाताला सामोरे जावे लागले आहे. सदर रस्त्याच्या बांधकामासाठी युवक काँग्रेसने यापूर्वीही मोठे आंदोलन केले होते. तेव्हा कामाची गती वाढलेली होती. परंतु पुन्हा कंत्राटदार व अधिकारी यांच्या संगनमताने कामाचे स्वरूप कासवगतीने सुरू झाले.  दर्जाहीन कामे केल्या जात आहे. बेंबाळ ते नांदगाव मार्गावर नुकत्याच बांधकाम केलेल्या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या मधोमध जेसीबीने खड्डे खोदून ठेवले असून यामुळे नुकताच एक मोठा अपघात झाला. या रस्त्यामुळे पुन्हा जीवघेणे अपघात होण्याची शक्यता  युवक कॉंग्रेसने वर्तविली आहे.  कंत्राटदाराच्या चुकीमुळे प्रवाशांचे जीव जात असेल तर याला जबाबदार कोण? असा सवाल युवक कॉग्रेसने प्रशासनास विचारला आहे. या सर्व निकृष्ट बांधकामाचा निषेध म्हणून युवक काँग्रेसचे प्रशांत उराडे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पवन नीलमवार काँग्रेसचे कार्यकर्ते मल्लेश मुद्रिकवार, मारोती गद्येकार, उमाकांत मडावी, सुकलाल शिंदे, शांताराम सातरे, समीर सातरे, जालिंदर वाळके राकेश कुंभारे, मनीष सातरे,छकुल वाळके तथा अन्य कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यावर बेशरमाचे झाड लावून निषेध केला.  कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केल्या गेली. मागणी पूर्ण न झाल्यास या विरोधात संपूर्ण रस्त्यावर चक्काजाम करून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवक काँग्रेसने दिलेला आहे.
पुलाचे बांधकाम सुदधा रखडलेले :— खेडी ते गोंडपिपरी या मार्गावर ठिकठिकाणी पुलाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत सापडले आहे. अतिशय धिम्या गतीने पुलाचे बांधकाम सुरू असल्याने त्याचा परिणाम येथील वाहतुकीवर झाला आहे.ठिकठिकाणी रखडलेलेे पुलाचे अर्धवट बांधकाम सुदधा बांधकाम विभागाच्या दिरंगाईचे उदाहरण असल्याचे युवक कॉग्रेसने म्हटले आहे.