वाघाच्या शिकार प्रकरणात दोघांना अटक

230

वाघाच्या शिकार प्रकरणात दोघांना अटक
मूल :- मागील वर्षी वाघाची शिकार करणा-या दोघा आरोपींना मुद्देमाला सहीत अटक करण्यात आली. शेतातील विद्युत करंटने वाघाचा मॄत्यू झाला होता. त्याचे कु-हाडीने तुकडे करून शेतातच जाळले होते. या घटनेची वाच्यता कुठेही झाली नव्हती. परंतु, नुकतेच आरोपी आणि एका व्यक्ती मध्ये प्रेमविवाहाच्या कारणावरून भांडण झाले. सदर व्यक्तीने भांडणाचा वचपा काढला. आणि वाघाचे शिकार प्रकरण उघडकीस आले. या घटनेने वनविभाग व गावात खळबळ उडाली आहे.