मुंबईच्या पर्यटकांना छोटा मोगलीचे दर्शन
सोमनाथ व्याघ्र जंगल सफारी,पर्यटक खुश
मूल :—विनायक रेकलवार
बफर झोनच्या मूल वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाअंतर्गत सोमनाथ जंगल सफारी हे नवीन पर्यटन क्षेत्र सुरू झाले.या गेट मधून पर्यटक जंगलाचा मनमुराद आनंद घेत आहेत.नुकतेच सफारी वर आलेले मुबंईच्या पर्यटकांना या जंगलात छोटा मोगली वाघाचे तसेच वाघीण आणि तीचे तीन बछडे याचे दर्शन झाले.यावेळी पर्यटकांचा आनंद गगनात मावेनाशा झाला होता. ब—याच पर्यटकांना वाघ, बिबट सह विविध वन्यप्राण्योचे दर्शन होवू लागल्याने या सोमनाथ गेटला पर्यटकांची पसंती दर्शविल्या जात आहे. ताडोंबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येथे बफर झोनचे वनपरिक्षेत्र कार्यालय आहे.या कार्यालयाअंतर्गत सोमनाथ येथे सफारी गेट सुरू करण्यात यावे अशी ब—याच वर्षापासूनची मागणी अखेर पूर्णत्वास आली. पालकमंत्री यांच्या हस्ते सोमनाथ गेटचे उदघाटन करण्यात आले.या सफारी गेटला पर्यटकांची आता चांगली पसंती मिळत आहे.पर्यटकांना सोमनाथ सफारी गेट मुळे पर्यटकांचा दुहेरी फायदा होत आहे. सोमनाथ हे निसर्गरम्य ठिकाण आहे.येथील आमराई आणि वृक्षवेली मुळे येथे वातावरण थंड राहण्यास मदत होते. जवळच काळया पाषाणावरून धावणारा धबधबा आहे.धबधब्यचा झुळझुळ आवाज आणि पशुपक्ष्यांचा मंजूळ स्वर यामुळे पर्यटकांचा आनंद द्विगुणीत होतो आहे.जवळच काळया पाषाणाच्या टेकडीवर शिवलिंग मंदिर आहे. एकीकडे सफारीचा आनंद लुटाता येतो आणि दुसरीकडे सोमनाथ मंदिराचे दर्शन सुदधा घेता येते.त्यामुळे पर्यटकांचा ओढा सोमनाथकडे वळताना दिसत आहे. या सोमनाथच्या जंगलात वाघ बिबट सह अस्वल,हरीण,निलगाय,सह अनेक वन्यप्राण्याचे हमखास दर्शन होत आहे.त्यामुळे हे गेट लवकरच प्रसिदधी झोतात आले. व्याघ्र दर्शनामुळे पर्यटक खुश होताना दिसत आहे.छोटा मोगली आणि वाघीण व तिचे तीन बछडे याचे दर्शन होत असल्याने पर्यटकांची सफर यशस्वी ठरत आहे.