देवनिल विद्यालय टेकाडीची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

27

देवनिल विद्यालय टेकाडीची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
मूल :- विद्यासागर शिक्षण प्रसारक मंडळ मुल द्वारा संचालित देवनिल विद्यालय टेकाडी येथील माध्यमिक शालांत परीक्षा 2024 चा निकाल 95•08% लागला असुन उत्कृष्ट निकालाची परंपरा राखली आहे. परीक्षेत प्रविष्ट झालेल्या एकूण 61 विद्यार्थ्यां मध्ये प्रथम कु गुंजन कैलास आलोने 94.40% , द्वितीय कु श्रुतिका अशोक आवळे 91.40%, तृतीय दीक्षा हितेश जेंगठे 88.88%, कु श्वेता उमाजी बोलीवर 83.20 % यांच्या सह 20 विद्यार्थी प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आणि 21 विद्यार्थ्यी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. मुख्याध्यापक राजेश सावरकर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱयांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.