5 जून जागतिक पर्यावरण दिन  ,पर्यावरण संवर्धनासाठी एका शिक्षिकेची धडपड

77
5 जून जागतिक पर्यावरण दिन
पर्यावरण संवर्धनासाठी एका शिक्षिकेची धडपड
तयार केले जातात रोपे आणि सिडबॉल्स
पर्यावरण पुरक साजरे होतात सण समारंभ
मूलः- विनायक रेकलवार
पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे.त्याचा जनसामान्याना फटका बसत आहे. सिमेंटचे जंगल उभे झाले. वृक्षतोडही वाढली.त्यामुळे तापमानात दिवसेदिवस वाढ होत आहे.यासाठी पर्यावरणाचे संरक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. यासाठी मूल येथिल एक शिक्षिका धडपड करीत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी धडपडणा-या या  शिक्षिकेचे नाव वर्षा भांडारकर असे आहे.त्या मूल येथील नवभारत विदयालयात सहा.शिक्षिका पदावर कार्यरत आहेत. मागिल पंधरा वर्षापासून त्यांचा हा उपक्रम सुरू आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी त्या विविध उपक्रम राबवित आहे.दरवर्षी हजारो सिडबॉल्स आणि रोपे तयार करतात.मागणीनुसार त्याचे ते वितरण करतात.विविध कार्यक्रमात त्या रोपेच भेट म्हणून देतात.सण, समारंभ ,कार्यक्रमाप्रसंगी त्या रोपे तयार करून आप्तेष्टांना देतात. पर्यावरण पुरक कार्यक्रमावर त्यांचा भर असतो.   त्यांनी दिलेल्या विविध रोपाचे वृक्षात रूपांतर झाले आहे. घरोघरी जावून त्या रोपे लागवड करतात. काही फळझाडे मोठे झाले आहेत. त्याचे फळही त्यांना चाखायला मिळत असल्याने त्यांना मोठा आनंद होतो. आंबा,कडूलिंब,गोडलिंब,तुळस,पिंपळ,वड,बांबू,करंजी,स्नेक प्लॅन्ट,कदम,आवळा,डाळींब यांची ते रोपे तयार करून लागवड करतात. तसेच काही वृक्षांच्या बियांचे सिडबॉल्स सुदधा तयार करतात.मागिल वर्षी त्यांनी हजारो सिडबॉल्स तयार करून ठिकठिकाणी वितरीत केले.शाळेमध्ये विदयार्थ्याना सुदधा त्या रोपे आणि सिडबॉल्स तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवितात. त्यामुळे विदयार्थ्यांमध्येही त्यांनी झाडे लावा – झाडे जगवा याविषयी आवड निर्माण केली. त्यांच्या या उपक्रमामध्ये कुटुंबीयाची मोठी मदत होते. पर्यावरण आणि वृक्षलागवडीच्या क्षेत्रातील त्यांच्या कार्याची मूल नगर पालिकेने दखल घेतली.त्यांना ब्रॅंड अम्बेसिडर बनविले.पर्यावरण मित्र बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या त्या मार्गदर्शिका आहेत.त्यांच्या उपक्रमामुळे त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्या पर्यावरण स्नेही असल्याने पर्यावरणावर आधारीत त्यांचे कविता लेखनही सुरू असते.
प्रदुषणाचे घातक परिणाम सजिव सृष्टीवर होत आहे.हे थाबविले नाही,तर सृष्टीचे चक्र बदलून जाईल.त्यासाठी पर्यावरणाचे संरक्षण करणे काळाची गरज आहे.त्यासाठी माझा हा उपक्रम मी पंधरा वर्षापासून अविरत पणे राबवित आहे. त्याचा समाजाच्या सेवेसाठी मोठा फायदा होत आहे. – वर्षा भांडारकर,मूल