जनतेचा आवाज परिवारातर्फे दहावीची गुणवंत विदयार्थींनी नंदिनीचा सत्कार
डॉक्टर बनणार तिचे ध्येय
मूल :- येथील न्युज पोर्टल जनतेचा आवाज परिवारातर्फे शिंपी समाजाची इयत्ता दहावीची गुणवंत विदयार्थींनी नंदिनी रूपेश रामगीरवार हिचा सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. नंदिनीने दहावीत 92 टक्के गुण मिळवले.ती मूल येथील बल्लारपूर पब्लीक स्कूलची विदयार्थीनी होती. बारावी नंतर वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेऊन डॉक्टर बनायचे असल्याचे तिने यावेळी सांगितले. शिंपी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते अशोकराव चन्नूरवार आणि सामाजिक कार्यकर्त्या जयश्री चन्नूरवार यांच्या हस्ते नंदिनीचा सत्कार करण्यात आला.यावेळी जनतेचा आवाज परिवारातील गजानन रेकलवार,निलिमा रेकलवार,चेतना रेकलवार,धनश्री रेकलवार,मुख्य संपादक विनायक रेकलवार, नंदिनीची आई आणि भाऊ उपस्थित होते. सर्वांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. समाजाचे आपण काही देणं लागतो. समाजाने आपल्याला मोठे केले,त्या समाजाचे ऋण आपण फेडले पाहिजे. त्या उद्येशाने, ‘ समाजाच्या सेवेसाठी – गुणवत्ता वाढीसाठी ‘ हे दहावी आणि बारावीच्या गुणवंत – यशवंत विदयार्थ्यांच्या सत्कार मागचे ब्रीद वाक्य ठेवण्यात आले आहे. स्व.श्री.ओमाजी पोषटटी रेकलवार आणि स्व.सिंधुताई ओमाजी रेकलवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ हे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. पारंपारिक व्यवसाय सांभाळून शिंपी समाज आपली प्रगती करीत आहे. मागासलेपणा असल्याने बरेच मूले – मूली शिक्षणापासून वंचित राहतात. शिक्षण घेतले तरी,अर्धवट शिक्षण घेवून रोजगाराच्या मागे धावतात. पुढील शिक्षण घेण्याची त्यांच्यात आवड निर्माण होत नाही. त्या कारणास्तव, समाजातील विदयार्थी आणि विदयार्थीनीनी उच्च शिक्षण घेतले पाहिजे. आपली प्रगती साधली पाहिजे. हा विचाराचा धागा गुंफून ‘ समाजाच्या सेवेसाठी – गुणवत्ता वाढीसाठी ‘ हे ब्रीद वाक्य ठेवण्यात आले. प्रत्येक शैक्षणिक सत्रामध्ये शिंपी समाजातील दहावी आणि बारावीतील गुणवंताचा सत्कार करण्यामागचा उद्येश जनतेचा आवाज परिवारातर्फे ठेवण्यात आला आहे.
चांगला उपक्रम :- न्युज पोर्टल जनतेचा आवाज परिवारातर्फे उचलेला हा चांगला उपक्रम आहे. शिंपी समाजातील दहावी बारावीतील गुणवंताचा सत्कार हा झालाच पाहिजे. सत्कारामुळे त्यांना प्रेरणा मिळते.आणि आपले ध्येय त्यांना साधता येते. जनतेचा आवाज न्युज पोर्टलने असेच चांगले उपक्रम राबवावे अशी शुभेच्छा अशोकराव चन्नूरवार आणि जयश्री चन्नूरवार यांनी दिल्या.
Home Breaking News जनतेचा आवाज परिवारातर्फे दहावीची गुणवंत विदयार्थींनी नंदिनीचा सत्कार , डॉक्टर बनणार तिचे...