विविध समस्यांनी शेतकरी बेजार , प्रश्नांचा तात्काळ निपटारा करा – प्रकाश पाटिल मारकवार यांची मागणी

150
विविध समस्यांनी शेतकरी बेजार
प्रश्नांचा तात्काळ निपटारा करा
प्रकाश पाटिल मारकवार यांची मागणी
मूल
 :- बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील शेतकरी शेतमजूर आणि सामान्य नागरिक विविध समस्यानी बेजार झाला आहे.त्या समस्या सोडविण्याची मागणी विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी सदस्य प्रकाश पाटिल मारकवार यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कडे केली आहे.मागिल चाळीस वर्षापासून गोसीखुर्द प्रकल्प रखडलेला आहे.या प्रकल्पाला 1500 कोटी रूप्यांचा निधी देण्यात आला.तरीही कामला गती नाही.शिघ्र गतीने गोसीखुर्दच्या कामाला सुरूवात करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मतदार संघात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या अधिक आहे.त्यांच्या हाताला काम  नाही. राज्य आणि केंद्र सरकार कडून क्षेत्रात मोठे उदयोग उभारण्यात यावे.जेणे करून बेरोजगारीची समस्या सुटेल याविषयी प्रयत्न करण्याची मागणी त्यांनी केली आहे.तालुक्यातील शेतकरी कर्जामुळे बेजार झाला आहे.त्याला पूर्ण कर्जमाफी देण्यात यावी आणि नवीन कर्ज मिळण्याची प्रक्रिया सोपी करावी तसेच घरकूल धारकांना  घरकुलाचा निधी त्वरीत मिळावा अशी मागणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिलेल्या निवेदनातून प्रकाश पाटिल मारकवार यांनी केली आहे.