चिचपल्ली पिंपळखुट येथील नागरिकांना संतोषसिंह रावत यांच्या पुढाकाराने ब्लँकेट वाटप व भोजन दान

173

चिचपल्ली पिंपळखुट येथील नागरिकांना संतोषसिंह रावत यांच्या पुढाकाराने ब्लँकेट वाटप व भोजन दान

 

मुल – गेल्या २१ जुलै पासून सुरु असलेल्या संतत धार पाऊसामुळे चीचपल्ली येथील मामा तालाव फुटून २०० नागरिकांच्या घरात पानी घुसून गरीब नागरीकांचे खूप मोठे नुकसान झाले. घरातील जीवनावश्यक वस्तु भांडे अनाज इत्यादि साहित्याचे नुकसान झाले. याबाबत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी प्रत्यक्ष बाधित नागरिकांची व ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चा केली. व स्वतःच्या पुढाकाराने तालुका कांग्रेस सह २७ जुलै रोजी चीचपल्ली व पिंपळखुट येथील नागरिकांना ब्लँकेट वाटप केले व भोजन दान दिले.

 

याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंहरावत, चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गंगाधर वैद्य, माजी जी.प. सदस्या मंगला आत्राम, सामाजिक कार्यकर्ते मधुकर मेश्राम, जिल्हा काँग्रेसचे महासचिव घनश्याम येनुरकर, कृषी बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र कन्नमवार, संचालक किशोर घडसे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरु गुरनुले, युवक काँग्रेस अध्यक्ष पवन निलमवार,शहर अध्यक्ष सुनील शेरकी,महिला कांग्रेस सचिव शामला बेलसरे, सरपंच पपिता कुमरे, उपसरपंच चंदन उंचेकर, सदस्य रवींद्र सुत्रपवार, विजय नागपुरे,बाळु दुर्योधन, अमोल गेडाम,प्रसन्न दुर्योधन, पालक झाडे, संजय म्याकलवार, नारायण खापने, विनोद मेश्राम, श्रीकृष्ण जुमनाके, अशोक जुमनके, बिर्शा गेडाम, धनराज दडमल व चीचपल्ली पिंपळखुट गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.