श्रावण सोमवार
सोमनाथ – भाविकांचे श्रदधास्थान
श्रावणात सोमनाथचे सौदर्यं बहरले
मूल:- विनायक रेकलवार
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मूल नगरीला आणि पंचक्रोशीच्या परिसराला निसर्गाचे भरभरून दान लाभलेले आहे. या दानाची लयलुट सोमनाथ मध्ये प्रवेश करताच होत असते. मूल पासून नऊ किमी अंतरावर सोमनाथ देवस्थान निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे.शिवलिंगाची मनोभावे पुजा,गायमुख, बारमाही धावणारा धबधबा,त्याचा खळखळ आवाज, काळे पाषाण,दगडाच्या कमानी आणि टेकडीवरील दगडाच्या गुफा, दरी खोरे , आमराई,वृक्ष वेली आणि पक्ष्यांचा मंजूळ स्वर येथिल सर्वच दृश्य अप्रतिम आणि आनंददायी आहेत. मूल पासून सुरू झालेल्या टेकडया पश्चिम दिशे पर्यंत विस्तारल्या आहेत. पर्यटकंाना आणि भाविकांना लांबूनच या टेकडया दर्शन देतात. या टेकडयांचा परिसर म्हणजे सोमनाथ होय. वाघांचे वास्तव्य असलेले हे ठिकाण आहे. या टेकडीवर काळया पाषाणावर सोमनाथ मंदिर उभे आहे. मंदिर फार पुरातन आहे. येथे असलेल्या शिवलिगामंळे या स्थळाचे सोमनाथ असे नामकरण झाले. मूल पासून नऊ किमी अंतरावर पश्चिमेस हे देवस्थान वसलेले आहे. येथील शिवलिंगाच दर्शन,बाराही महिने सतत वाहणारा धबधबा आणि निसर्गाचा अनमोल ठेवा मनात साठवून भाविक धन्य होतात. मंदिराच्या गाभा-यातील शिवलिंगाची मनोभावे पुजा अर्चा केली जाते.दर श्रावणात आणि महाशिवरात्रीला तसेच बाराही महिणे सोमनाथ येथे भक्तांची आणि पर्यटकांची मोठी गर्दी असते. श्रावणाताील येथील नैसर्गिक वातावरणाची मुक्त उधळण पर्यटकांना मोहित करते. उंच टेकडया वरून काळया पाषाणातून खळखळ करीत धावणारा धबधब्याने पर्यटक विशेष आकर्षित होतात.येथिल वनराई आणि दगडाच्या कमानी,गुफा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात. मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या गायमुखाचे दर्शन घेवून भाविक मंदिरातील शिवलिंगाची मनोभावे पुजा करतात. श्रावणातील येथिल निसर्गाची उधळण आणि मंदिराच्या दर्शनाने सोमनाथला पाय ठेवल्याचा त्यांना मोठा आनंद मिळतो. येथील थंड,शुदध आणि स्वच्छ वातावरणामुळे भाविक कृतार्थ होतात.