प्रगती माध्यमिक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्थेची आमसभा

134
पतसंस्थेची प्रगती दिवसेंदिवस होत राहो – राजेश सावरकर
प्रगती माध्यमिक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्थेची आमसभा
मूल 
:- प्रगती माध्यमिक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्थेची प्रगती दिवसेंदिवस होत राहो ,असे प्रतिपादन पतसंस्थेचे पहिले अध्यक्ष राजेश सावरकर यांनी व्यक्त केले. पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. येथिल देवनिल कनिष्ठ महाविदयालयाच्या सभागृहात 2023-2024 वर्षासाठीची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती.सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे उपाध्यक्ष किशोर गोपशेटटीवार हे होते.प्रमुख पाहूणे म्हणून मुख्याध्यापक राजेश सावरकर,किरण खोब्रागडे,केवळराम कामडी,सचिव अनिल कामडी,प्राचार्य मंडलवार,संचालक मंडळ विनोद मानापूरे,भूषण आडकिने,भिमदास भसारकर,मिलिंद भेंडारे,रविंद्र गिरडकर,लता सलामे,मारोती गोरडवार,ज्योती धरणेवार,शारदा मेश्राम,सुशिला उडाण यांची उपस्थिती होती.मान्यवरांच्या हस्ते फोटो पुजन आणि दीपप्रज्वलाने करण्यात आले.प्रमूख पाहूणे म्हणून बोलताना, राजेश सावरकर यांनी पतसंस्था स्थापन करण्यामागचा उददेश विशद केला. यावेळी मुख्याध्यापक किरण खोब्रागडे,सेवानिवृत्त शिक्षक युवराज चावरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 22 वा वार्षिक अहवालाचे वाचन पंतसंस्थेचे सचिव अनिल कामडी यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर गोपशेटटीवार यांनी पतसंस्थेच्या प्रगती विषयी आणि पुढील योजनेविषयी माहिती दिली. यावेळी सभेच्या कार्यवाहीस, वार्षिक अहवाल जमाखर्च पत्रक,नफातोटा पत्रक,ताळेबंद पत्रक,नफा विनीयोगास मंजूरी आणि इतर विषयांना मंजूरी देण्यात आली. सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे समाधान करण्यात आले. पतसंस्थेतंर्गत सहभागी शाळेतील सेवा निवृत्त झालेल्या शिक्षक व   शिक्षकेत्तर  कर्मचारी वर्गांचा यावेळी सपत्नीक सत्कार करण्यात आला.यामध्ये युवराज चावरे ,भास्कर गुरनूले,धनंजय गुरनूले,जगदीश घडसे ,नरेंद्र कुंभारे यांचा सपत्नीक शाल,श्रीफळ व भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. तसेच 10 तील गुणवंत विदयार्थी संकेत कोल्हे,अक्षरा मोहूर्ले,निनाद खनके आणि 12 वी तील अनघा उरकूडे,स्वाती मिश्रा,सानिका टेप्पलवार,सानिका वाघरे यांचा स्मृतीचिन्ह व भेटवस्तू देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सभेचे संचालन शंकर दडमल,तर आभार सुशिला उडाण यांनी मानले. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापक दशरथ बोदलकर यांनी अथक परिश्रम घेतले.सभेला सदस्य वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. सदस्यांना लाभांस वाटप आणि लेदर बॅगचे वितरण करण्यात आले.अल्पोहार आणि राष्ट्र्रगीताने सभेची सांगता झाली.