मूल तालुक्यात होणार सिंचन क्रांती ४९७ विहिरींना मंजुरी रोजगार हमी योजना अनुदानही वाढले
मूल : दुष्काळावर मात करीत शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी व त्यातून उत्पादनात वाढ होवून शेतकरी समृद्ध व्हावा याकरिता मूल तालुक्यात ४९७ विहिरींना मंजुरी मिळाली असून या विहिरींच्या माध्यमातून मुल तालुक्यात सिंचन क्रांती होणार आहे. शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून हर खेत को पाणी या उपक्रमांतर्गत ग्रामसभेच्या माध्यमातून प्रत्येक गावांमधून शेतकऱ्यांचे प्रस्ताव विहिरींकरिता मागविले होते यात मूल तालुक्यात ७३५ विहिरींचे उद्दिष्ट होते. त्यापैकी 500 प्रस्ताव प्राप्त झाले असून 497 विहिरी मंजूर झाल्या आहेत. 444 विहीरींचे तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तर जवळपास दहा विहिर बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी नेहमीच अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होऊन शेतकरी आर्थिक विवेचनेत सापडला जातो. मात्र आता शेतकऱ्यांना सिंचन विहिरीची जोड मिळत असल्याने शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न सुटणार असून शेतकरी सुखावणार आहे. अनुदान चार लाख बांधकाम साहित्याच्या किमती गगनाला भेटल्या असल्याने तीन लाख रुपयात विहीर बांधणी शक्य नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली होती मात्र शासनाने शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेत विहीर बांधकामा करिता अनुदानात वाढ केली आहे.