जीवे मारण्याची धमकी देणा-या अवैध दारू विक्रेत्याविरूद्ध कारवाई करा – महिलेची मागणी
मूल :- जीवे मारण्याची धमकी देणा-या अवैध दारू विक्रेत्याचा बंदोबस्त करा. त्याच्या विरूद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी बेंबाळ येथील योग शिक्षिका प्रतिभा बाबुराव मारगोनवार यांनी केली आहे.येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली आपबिती सांगितली. बेंबाळ येथील अवैध दारू विक्रेता तेलकुंटलवार नामक व्यक्तीमुळे मी दोन वर्षांपासून त्रस्त आहे.2023 मध्ये दिलेल्या तक्रारीवर तेलकुंटलवार नामक व्यक्तीविरूदध पोलिस प्रशासनाने फक्त प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यांनतरही सदर व्यक्तीच्या वागणुकीत कोणताही फरक पडला नाही.घराजवळ येणे,शिवीगाळ करणे आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचे त्याचे कृत्य सुरूच आहे.त्याच्या या गैरकृत्यामुळे मी पूर्णतः त्रस्त आहे.तसेच माझे मानसिक आरोग्य बिघडत चालले आहे. रोजच्या धमकी मुळे मला व माझया कुटुंबीयाना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. जीवे मारण्याच्या धमकी मुळे आमच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे.त्यामुळे पोलिस प्रशासनाने आम्हाला पोलिस संरक्षण पुरवावे,तसेच तेलकुंटलवार नामक व्यक्तीची नार्को चाचणी करावी. माझया जीवाला धोका निर्माण झाल्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. नाहीतर अवैध दारू विक्रेता विरूदध पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करावी,अशी मागणी प्रतिभा मारगोनवार यांनी पत्रकार परिषदेत केली.