26 जानेवारी चा मसुदा ओबीसी समाजासाठी अन्यायकारक

30
प्रकाश पाटील मारकवार (माजी अध्यक्ष जिल्हा परिषद  चंद्रपूर ) यांनी दिले निवेदन
    मूल :- मराठा समाजाला व सगे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहे. त्यामुळे ओबीसी समाजाचे फार मोठे नुकसान होत आहे. २६ जानेवारीच्या राजपत्रानुसार मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करण्यात यावे. या मसुद्यामुळे संपूर्ण राज्यातील ओबीसी समाजामध्ये असंतोष पसरला आहे. हा मसुदा ओबीसी समाजासाठी अन्यायकारक आहे.
  त्याचप्रमाणे ओबीसी समाजाला न्याय द्यायचा असेल तर जाती निहाय जनगणना करण्यात यावी. सन १९९४ मध्ये ओबीसी ना २७% आरक्षण देण्यात आले. राज्यात ओबीसी प्रवर्गात ४०९ जाती आहेत. या आरक्षणाचा फायदा पूर्णपणे ओबीसी समाजाला मिळालेला नाही. त्यात जर मराठा समाजाला व सगे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले तर ओबीसी समाजाला आरक्षणाचा काहीही लाभ मिळणार नाही.
         मराठ्याला स्वतंत्र आरक्षण द्यावे .मात्र ओबीसी कोट्या मधून देवू नये. सगे सोयरे  या अध्यादेशामुळे ओबीसी समाजात संतापाची लाट पसरलेली आहे. याबाबत त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निवेदन दिले.