माँ.दुर्गा मंदिर मुल येथे वर्धापन (स्थापना दिवस) निमित्त मातेचा दुग्धाभिषेक व कुंकुम पूजन

49

माँ.दुर्गा मंदिर मुल येथे वर्धापन (स्थापना दिवस) निमित्त मातेचा दुग्धाभिषेक व कुंकुम पूजन
महाप्रसाद भोजनाला हजारों भाविकांची गर्दी
मूल – श्री. माँ दुर्गा मंदीर सेवा समिती मूलच्या वतीने मंदिराच्या आवारात जागृत माता श्री. माँ. दुर्गादेवी मंदीराचा आठवा वर्धापन दिन सोहळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोमवार दि. २६ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ८ वा. समिती संचालक रुपलसिंह रावत व सौ. मोना रावत यांनी यांचे हस्ते मंदिराचे पुजारी मुकेशजी मिश्रा यांच्या मंत्रोपचार पद्धतीने पुजा अर्चा करण्यात आली. नंतर सकाळी ९ वा. पासुन मातेचा दुग्धाभिषेक सोहळा मंदिर समितीचे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत व सौ. मामता रावत यांनी महाआरती असंख्य भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आली. दुपारी १ वा. पासुन महीलांकरीता *कुंकुम पुजा* आणि संध्याकाळी ७ वा. आरती नंतर महाप्रसाद *(महाभोजन)* आयोजित करण्यात आला. या महाप्रसादाचा आस्वाद तालुक्यातील व मुल शहरातील चार हजारांच्या वर भाविकांनी आस्वाद घेतला. माँ.दुर्गा मातेचा द्वीदिवसीय सोहळा आयोजनासाठी मंदिर समितीचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांचे मार्गदर्शनात समितीचे उपाध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, सचिव संजय पडोळे, संचालक घनश्याम येनुरकर, राजेंद्र कन्नमवार , केदारनाथ कोटगले, गुरु गुरनुले, चतुर मोहुरले, सुरेश देशमुख, छोटू रावत, सुनील मंगर, यांनी सहकार्य केले. महाप्रसाद भोजन व्यवस्थेसाठी राकेश रत्नावार, घनश्याम येनरकर, संजय पडोळे, राजेंद्र कन्नमवार, रुपल रावत, सुनील मंगर, गुरु गुरनुले, केदारनाथ कोटगले, लोमेश नागापुरे, व्यंकटेश पुल्लकवार, तेजस महाडोळे व युवशक्तीची पूर्नटीम, यांनी परिश्रम घेतले. महिलांच्या गर्दीसाठी शामलता बेलसरे, राधिका बुक्कावार,संमता बनसोड,सीमा भसारकर यांनी मेहनत घेतली.