भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मूल तालुका सर्व फ्रंटल सेलचे पदाधिकारी यांना दिले नियुक्ती पत्र
विरोधी पक्षनेते ना.विजय वडेट्टीवार यांचे हस्ते पत्र देऊन केले सन्मानित
मुल : अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या अध्यक्ष,श्रीमती सोनियाजी गांधी, राष्ट्रीय युवा नेते खासदार राहुल गांधी प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार व काँग्रेसचे पॉवर फुल नेते विधान सभेचे विरोधी पक्ष नेते यांच्या नेतृत्वात व जिल्ह्यातील कांग्रेस नेते व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत यांच्या प्रमुख मार्गदर्शनात, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व जिल्हा महासचिव राकेश रत्नावार, माजी सभापती, संचालक तथा जिल्हा महासचिव घनश्याम येनुरकर, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, ग्रामीण नेते राजू पाटील मारकवार, तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, महिला अध्यक्षा रुपाली संतोषवार, शहर अध्यक्ष सुनील शेरकी, जिल्हा किसान सेल अध्यक्ष दीपक पा. वाढई, ओबीसी सेल प्रदेश सरचिटणीस गुरुदास चौधरी, महासचिव दशरथ वाकुडकर, बंडू गुरनुले, सुमित आरेकर, यांचे सह अनेक ग्रामीण कांग्रेस पदाधिकारी यांचे उपस्थितीत नियुक्त करण्यात आलेल्या सर्व फ्रंतल सेलचे पदाधिकारी यांची निवड त्या -त्या विभागाकडून करण्यात आली असून त्यांच्या नियुक्तीचे पत्र विधान सभेचे विरोधी पक्षनेते ना. विजय वडेट्टीवार यांचे शुभ हस्ते व मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. महाराष्ट्र ओबीसी विभागाच्या प्रदेश सचिव पदी कांतपेठ येथील राजेंद्र वाढई यांची नियुक्ती झाल्याने नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच मुल तालुका अनुसूचित जाती(एस.सी.) विभाग तालुका अध्यक्ष पदी चिखली येथील संजय गेडाम, अनुसूचित जमाती. (एस टी.)सेल तालुका अध्यक्षपदी दहेगाव येथील काँग्रेसच सक्रिय किशोर पेंदाम यांची नियुक्ती तर आदिवासी विभाग मुल शहर अध्यक्षपदी काँग्रेसचे निष्ठावान, होतकरू संगीत विशारद नेतृत्व असलेले अशोक येरमे, विमुक्त जाती भटकी जमाटी विभाग (एन. टी.) सेल तालुका अध्यक्षपदी गणेश गेडाम मुल यांची निवड झाली. तर मुल तालुका महिला कांग्रेस पदाधिकाऱ्यांनाही ना.वडेट्टीवार यांचे हस्ते नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यात ग्रामीण मुल तालुका आदिवासी सेल विभाग तालुका अध्यक्षपदी मरेगाव सरपंच सौ. जोत्सना पेंदोर, मुल शहर महिला कांग्रेस अध्यक्षपदी संयमी निगर्वी संघटन नतृत्वगुन संपन्न असलेल्या व्यक्तिमत्व सौ. नलिनी आडपवार , मुल शहर उपाध्यक्षपदी माजी नगर सेविका सौ.लीना फुलझेले, मुल शहर महिला सचिव पदी, कांग्रेस निष्ठावान धडाडीच्या पुढाकार घेणाऱ्या वक्तृत्व गुण असलेल्या सौ. शामला बेलसरे यांनी निवड झाली. तर शहर महिला कोषाध्यक्ष पदी नियमित सक्रिय कार्यरत असलेल्या सौ.राधिका बुक्कावार, शहर उपाध्यक्षपदी धडाडीच्या सौ.समता बनसोड, यांची निवड, तर मुल शहर सचिव पदी सौ. अल्का कामडे, सहसचिव सौ. फर्जना शेख, इत्यादींची निवड करण्यात आली असून महिला तालुका व शहर महासचिव पदावर काही होतकरू सक्रिय नियमित येणाऱ्या महिलांची नियुक्ती तातडीने करण्यात येणार आहे. यांच्या नियुक्तीचे वर्तमान काळात काँग्रेस मोठ्या प्रमाणात व संख्येने उभी करावी व कांग्रेस संघटन मजबूत करावे. आपली जबाबदारी प्रामाणिकपणे सर्वांनी पार पाडवी अशी अपेक्षा व्यक्त केले असून उपस्थित सर्व कांग्रेस नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी नियुक्ती पत्र देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले.व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.